Badlapur News
Badlapur NewsSaam tv

Badlapur : बदलापुरातील वाहतूक कोंडी सुटणार; दोन नव्या उड्डाणपूलांसह सॅटिस आणि रेल्वे मार्गाला होणार समांतर पूल

Badlapur News : बदलापूर शहरातील रस्त्यांवर नेहमीच वाहतूक कोंडी होत असल्याचे अनुभव येत असतो. सायंकाळच्या सुमारास वाहतूक कोंडी अधिक प्रमाणात होते. हा प्रश्न मिटविण्यासाठी शहरात उड्डाणपूल करण्याची मागणी होती
Published on

मयुरेश कडव 
बदलापूर
: चाकरमान्यांसह वाहनधारकांना रोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असतो. बदलापूर शहरातील हा वाढत चाललेला वाहतूक कोंडीचा प्रश्न आता लवकरच निघाली निघणार आहे. कारण बदलापुरात दोन नव्या उड्डाणपूलांसह रेल्वे मार्गाला समांतर पूल आणि सॅटिस प्रकल्प होणार आहेत. यामुळे बदलापूरमधील वाहतूक कोंडीचा प्रश्न लवकरच सुटणार आहे.  

वाढती वाहनांची संख्येमुळे बदलापूर शहरातील रस्त्यांवर नेहमीच वाहतूक कोंडी होत असल्याचे अनुभव येत असतो. सायंकाळच्या सुमारास हि वाहतूक कोंडी अधिक प्रमाणात होत असते. हा प्रश्न मिटविण्यासाठी शहरात उड्डाणपूल करण्याची मागणी होती. त्या अनुषंगाने भाजप आमदार किसन कथोरे यांच्यासोबत भाजपा पदाधिकाऱ्यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी इतरही अनेक प्रकल्पांबाबत मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती आमदार किसन कथोरे यांनी दिली.

Badlapur News
Mawal Tragedy: हृदयद्रावक !'फादर्स डे'लाच मृत्यूने गाठलं; इंद्रायणीत बाप-लेक बुडाले

या मार्गावर होणार उड्डाणपूल 

बदलापूर शहरातील कात्रप परिसरात तसेच बॅरेज रोडवरील डीमार्ट ते खरवई परिसरातील होप इंडिया कंपनीपर्यंत असे दोन नवे उड्डाणपूल उभारण्यात येणार असून बेलवलीतील दत्त चौक ते बॅरेज रोडवरील समर्थ चौकापर्यंत रेल्वे मार्गाला समांतर पूल बांधण्यात येणार आहे. यासोबतच बदलापूर रेल्वे स्थानक परिसरात सॅटिस प्रकल्प उभारला जाणार असून त्यामुळे बदलापूर शहरातील वाहतूक कोंडीची समस्या निकाली निघेल, असा विश्वास आमदार किसन कथोरे यांनी व्यक्त केला. 

Badlapur News
Sambhajinagar Crime : मुलीला अश्लील व्हिडीओ दाखवून शिक्षकाकडून अत्याचार; खासगी क्लासमधील धक्कादायक प्रकार

१७ प्रकल्पांवर सकारात्मक चर्चा 

बदलापूर शहरात उल्हास नदीच्या पूर नियंत्रण रेषेचे पुनर्सर्वेक्षण करून रेड लाईन आणि ब्लू लाईनचा प्रश्नही निकाली काढण्याचं आश्वासनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. या बैठकीत बदलापूर पूर्व, बदलापूर पश्चिम, बदलापूर ग्रामीण आणि टिटवाळा पोलीस ठाण्यांची पुनर्बांधणी, क्रीडा संकुलाचा विकास अशा एकूण १७ प्रकल्पांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com