महाराष्ट्र

Nandurbar News: नंदुरबार जिल्ह्यात आदिवासींची हेळसांड; अंत्यसंस्कारासाठी नागरिकांचा नदीच्या पाण्याच्या प्रवाहातून धोकादायक प्रवास

Nandurbar News: वागदे गावातील ग्रामस्थांना स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्ता नसल्याने नदी-नाल्यातून मार्गस्थ व्हावे लागत असल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे.

Vishal Gangurde

सागर निकवाडे

Nandurbar News In Marathi

नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना अंतिम संस्कार करण्यासाठी 3-4 फूट खोल नदीतून अंत्यविधी करण्यासाठी जावे लागत असल्याचे समोर आले आहे. नवापूर तालुक्यातील वागदे गावातील ही समस्या आहे. या समस्येतून देश स्वतंत्र होऊन 76 वर्ष झाली तरी आदिवासींची हेळसांड सुरू असल्याचे दिसून येत आहे. वागदे गावातील ग्रामस्थांना स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्ता नसल्याने नदी-नाल्यातून मार्गस्थ व्हावे लागत असल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे. (Latest Marathi News)

वागदे गावात गेल्या अनेक वर्षांपासून स्मशानभूमीत जाण्यासाठी नाल्यावर पुलाची मागणी करण्यात येत आहे. परंतु प्रशासन लक्ष देत नसल्याची नाराजी आदिवासींनी व्यक्त केली आहे. आदिवासी विकास मंत्र्याच्या जिल्ह्यातील हा प्रकार आहे.

गावातील धावजी उघड्या नाईक या व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्यामुळे त्याचे प्रेत नदीतून अंतिम संस्कारासाठी नदीच्या पुरातून शनिवारी सकाळी मार्गस्थ होण्याची वेळ ग्रामस्थांवर आली. शासन प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

मुसळधार पावसामुळे नदीला पूर आला आहे. मात्र, या पाण्यात ग्रामस्थांना 3-4 फूट पाण्यात दोर बांधून अंत्यविधीसाठी स्मशानभूमी गाठावी लागत असल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे. मरणानंतर देखील आदिवासींच्या मरणयातना सुरूच असल्याचा हा प्रकार आहे.

तत्पूर्वी, नवापूर तालुक्यातील ग्रामीण भागात सोयी सुविधांच्या अभाव आणि त्यांच्या उडालेला बोजवारा पुन्हा एकदा उघड झाला आहे. धोकादायक पाण्याचा प्रवाहातून हा मृत्यूदेह दुसऱ्या बाजूला नेला जातो. हा व्हिडिओ नवापूर तालुक्यातील वागदे गावातून समोर आला आहे.

गेल्या वीस वर्षापासून स्थानिक नागरिक पुलाची मागणी करत आहेत. परंतु कोणीही त्यांच्यावर लक्ष द्यायला तयार नाही, असा आरोप येथील ग्रामस्थांनी सोशल मीडियाद्वारे केला आहे.

गावकऱ्यांना अंतिम संस्कार करण्यासाठी व जाण्यासाठी मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो. या कारभारावर स्थानिक ग्रामस्थद्वारा संताप व्यक्त केला जात आहे.

नंदुरबार जिल्ह्यात एकूण 638 ग्रामपंचायत आहेत. त्यापैकी 198 ग्रामपंचायतीत स्मशानभूमी आहेत. 440 ग्रामपंचायतीत स्मशानभूमी नसल्याची माहिती समोर आली आहे. राहिलेल्या ग्रामपंचायत समशानभूमी तयार करण्याच्या प्रस्ताव शासनाला सादर केल्याची माहिती मिळाली आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: विजेचा धक्का लागून २ भावांचा मृत्यू, आईच्या डोळ्यासमोर मुलांनी सोडले प्राण

Lizard : पालींनी हैराण केलंय? पाली घरातून कायमच्या पळवण्यासाठी करा हे घरगुती उपाय!

Thane Tourism : मुंबईजवळचं ठाणे पावसाळ्यात होते स्वर्गाहून सुंदर, वीकेंडला नक्की फिरा 'ही' ठिकाणे

Maharashtra News Live Update: पालघरमध्ये जगातील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय दर्जाची बाजारपेठ उभारण्याच्या हालचाली सुरू

Delhi : CNG पंपावर मोठा स्फोट, तिघांचा मृत्यू; गॅस भरताना टाकी फुटल्यानं परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT