Mumbai Local Train Mega Block Sunday
Mumbai Local Train Mega Block Sunday Saam tv

Mega Block on Sunday Mumbai: मुंबईकरांनो, रविवारी रेल्वेचा मेगाब्लॉक; कधी आणि कुठे अन् कसा? वाचा सविस्तर

Mega Block on Sunday Mumbai: रेल्वेने अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्याकरिता मेगाब्लॉक घोषित केला आहे.

Mumbai Mega block: मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी हाती आली आहे. रविवारी मुंबईत मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घोषित केला आहे. रेल्वेने अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्याकरिता मेगाब्लॉक घोषित केला आहे. (Latest Marathi News)

रेल्वेने मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक घोषित केला आहे. यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-विद्याविहार अप आणि डाऊन धिम्या मार्गावर सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे.

मेगाब्लॉक असल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमधून सकाळी १०.४८ ते दुपारी ३.४९ या वेळेत सुटणाऱ्या लोकल ट्रेन या सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळविण्यात येणार आहेत.

तसेच परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांदरम्यान थांबविल्या जातील. त्यानंतर विद्याविहार स्टेशनवर योग्य डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहे.

Mumbai Local Train Mega Block Sunday
Mumbai News: मुंबईत शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून पालिका कर्मचाऱ्यांना मारहाण; परिसरात भीतीचे वातावरण, काय आहे प्रकरण?

त्याचबरोबर घाटकोपरमधून सकाळी १०.४१ ते दुपारी ३.५२ पर्यंत सुटणाऱ्या लोकल ट्रेन या अप धिम्या मार्गावरील सेवा विद्याविहार ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशनदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. तसेच त्या लोकल ट्रेन या कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकांवर थांबणार आहेत.

हार्बर मार्गावर कसा असेल मेगाब्लॉक?

हार्बर मार्गावरील पनवेल-वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. (नेरुळ आणि किलेदरम्यान बीएसयू लाईन आणि तुर्भे आणि नेरुळदरम्यान ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गासह)

तर पनवेल येथून सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ वाजेपर्यंत सुटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. त्याचबरोबर शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ या वेळेत सुटणाऱ्या पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

हार्बर मार्गावरील नेरुळहून सकाळी १०.५० ते दुपारी ४.०९ वाजेपर्यंत सुटणारी ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्स हार्बर लाईन सेवा रद्द राहतील. तसेच ठाणे येथून सकाळी १०.५५ ते सायंकाळी ४.३३ वाजेपर्यंत नेरूळकरीता सुटणारी डाउन ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

ट्रान्स हार्बर मार्गावर कसा असेल मेगाब्लॉक?

नेरूळ येथून सकाळी ११.४० ते दुपारी ३.४५ वाजेपर्यंत सुटणाऱ्या खारकोपरकडे जाणार्‍या डाउन बीएसयू लाईन सेवा रद्द राहतील. तसेच खारकोपरहून बेलापूरला जाणार्‍या डाऊन बीएसयू लाईन सेवा वेळापत्रकानुसार चालतील, अशी माहिती आहे.

खारकोपर येथून दुपारी १२. २५ ते ४.२५ या वेळेत सुटणाऱ्या नेरूळकडे जाणार्‍या अप बीएसयू मार्गावरील सेवा रद्द राहतील. तसेच खारकोपरहून बेलापूरकडे जाणार्‍या अप बीएसयू मार्गावरील सेवा वेळापत्रकानुसार धावतील. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-विद्याविहार भागात विशेष उपनगरीय गाड्या धावतील.

Mumbai Local Train Mega Block Sunday
Sameer Wankhede News: अखेर समीर वानखेडेंना दिलासा! आर्यन खान प्रकरणात लाच घेतल्याच्या आरोपातून निर्दोष सुटका

ब्लॉक कालावधीत बेलापूर-खारकोपरदरम्यान बीएसयू लाईन सेवा उपलब्ध राहतील. तसेच ब्लॉक कालावधीत नेरुळ- खारकोपर दरम्यान बीएसयू लाईन सेवा उपलब्ध राहणार नाहीत. ठाणे- वाशी स्थानकांदरम्यान आणि ब्लॉक काळात ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा उपलब्ध असतील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com