Mumbai News: मुंबईत शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून पालिका कर्मचाऱ्यांना मारहाण; परिसरात भीतीचे वातावरण, काय आहे प्रकरण?

mumbai Kandivali News today: शिंदे गटाच्या शाखाप्रमुख आणि त्यांच्या दहा ते बारा कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप पालिका कर्मचाऱ्यांनी केला आहे.
BMC News
BMC Newssaam tv
Published On

संजय गडदे

Mumbai Kandivali News Today:

मुंबईच्या कांदिवलीमधून मोठी बातमी आली आहे. मुंबईच्या कांदिवलीत अनधिकृत बॅनर्स काढण्यासाठी गेलेल्या पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शिवसेना शिंदे गटाच्या शाखाप्रमुख आणि त्यांच्या दहा ते बारा कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप पालिका कर्मचाऱ्यांनी केला आहे. या घटनेने परिसरात एकच भीतीचे वातावरण पसरले आहे. (Latest Marathi News)

नेमकं काय घडलं?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका आयुक्त इकबाल सहल यांना अनधिकृत बॅनर्स आणि खड्ड्यांविरोधात कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. या निर्देशानुसारच कांदिवली पश्चिमेकडील एमजी रोड लिंक रोड जंक्शन परिसरात अनधिकृत बॅनर्स लावण्यात आले होते. या बॅनर्सवर कारवाई करण्यासाठी पालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी पोहोचले होते.

BMC News
Sameer Wankhede News: अखेर समीर वानखेडेंना दिलासा! आर्यन खान प्रकरणात लाच घेतल्याच्या आरोपातून निर्दोष सुटका

अनधिकृत बॅनरवर कारवाई करताना त्यावेळी शिंदे गटाचे शाखाप्रमुख प्रकाश गिरी आणि त्यांच्या पंधरा ते वीस कार्यकर्त्यांनी पालिका कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेमुळे पालिका कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं आहे.

मारहाणीच्या घटनेनंतर पालिका अधिकाऱ्यांनी पोलिसांत धाव घेतली आहे. तसेच या प्रकरणी कांदिवली पोलीस अधिक तपास करत आहेत.

दरम्यान, एक सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील खड्डे आणि रस्त्यावरील अनधिकृत बॅनर्सवर कारवाई करण्याचे निर्देश आयुक्त इकबाल सिंग चहल यांना दिले होते. त्यानुसार, पालिका कर्मचाऱ्यांकडून अंमलबजावणी होत असताना शिंदे गटाच्या कार्यकत्यांकडून मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

BMC News
Sambhaji Raje News: २ मुलांनी आत्महत्या केल्याने माझं मन व्यथित; मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर संभाजीराजे यांचं मोठं भाष्य

कोणत्या अधिकाऱ्यांना झाली मारहाण?

आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास पालिकेच्या आर साऊथ कार्यालयातील परिरक्षण विभागाचे सहायक अभियंता आणि वरीष्ठ निरीक्षक विभागाचे हेश दाजी म्हापणकर , हनिफ शेख आणि इतर कामगारांना शिवीगाळ करून धमकावण्यात आले आहे.

तसेच बेदम मारहाण करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून धमक्या देखील देण्यात आल्या आहेत. पालिका कर्मचाऱ्यांना मारहाण झाल्यामुळे पालिका कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचे आणि भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणी पालिका कर्मचाऱ्यांनी कांदिवली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com