Navapur Water Crisis Saam tv
महाराष्ट्र

Navapur Water Crisis : पायपीट करत गुजरातमधून आणावे लागते पाणी; अमलीफडीत भीषण टंचाई, महिलांचा तहसील कार्यालयावर हंडा मोर्चा

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यातील सहाही तालुक्यांमध्ये सध्या भीषण पाणी टंचाईच्या झळा पोहोचत आहेत. नळ आहेत पण त्या नळाला पाणी नाही. बोअरवेल सर्व आटले आहेत

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूर नगरपरिषदेच्या अखत्यारीत येणाऱ्या तीनटेंबा भागातील आमलीफळी वस्तीवर भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. तीन महिन्यापासून नळाला पाणीच आले नसल्याने पायपीट करत गुजरात राज्यातून पाणी आणावे लागत आहे. यामुळे पाण्याची व्यथा प्रशासनाला समजावी; यासाठी या भागातील महिला नगरपालीका आणि तहसिलकार्यालयावर हंडामोर्चा घेवूनच धडकल्या.  

नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील सहाही तालुक्यांमध्ये सध्या भीषण पाणी टंचाईच्या झळा पोहोचत आहेत. नळ आहेत पण त्या नळाला पाणी नाही. बोअरवेल सर्व आटले आहेत, विहिरीत पाणी उपलब्ध नाही, हातपंप देखील बंद झालेत. मात्र तरी देखील टँकरद्वारे पाणी पुरवले जात नसल्याने आदिवासी महिलांना (Water Scarcity) पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याची स्थिती नंदुरबार जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.

नवापूर (Navapur) तालुक्यातील अमलीफडी या वस्तीत गेल्या तीन महिन्यापासून पाण्याच्या टाकीत थेंबभर पाणी न आल्याने नळाला पाणीच येत नाही आहे. अशातच महाराष्ट्राच्या रहिवाशी असलेल्या या महिलांना जवळच गुजरात (Gujrat) राज्यातील गाव पाड्यावरून 2 किलोमीटर पायी जाऊन पाणी आणावे लागत आहे. त्यामुळे पाण्य़ाच्या टंचाईवर प्रशासनाला जाब विचारण्यासाठी महिला सुरवातीला नगरपालिकेवर धडकल्या. मात्र याठिकाणी कोणीही अधिकारी नसल्याने त्यांनी आपला मोर्चा तहसिलकार्यालयाकडे वळवला. तहसिलदांरांनी संबंधीत यंत्रनेशी भ्रमणध्वनीवरुन संपर्क करत या भागातील पाणी समस्या त्वरीत दुर करण्याच्या सुचना दिल्या. जर पाच दिवसात पाणी समस्या दुर झाली नाही; तर तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी महिलांनी दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahaharashtra Politics : एकाच वेळी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; दोन शिलेदारांचा भाजपमध्ये प्रवेश

Bigg Boss 19: 'तू खोटे बोलतेस...' सलमान खाननंतर रोहित शेट्टीने केली तान्या मित्तलची पोलखोल

Margashirsha Lakshmi Puja: मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार कधी आहे?

Jalna Crime: वहिनीसोबतच्या प्रेमासाठी रक्ताचं नातं केलं परकं; कट आखत परमेश्वरला संपवलं

Kalyan : लग्नसमारंभात कल्याण-डोंबिवलीत ३ दिग्गज नेते एकत्र; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT