Farmer Success Story : आंब्याच्या बागेतून ८ लाख रुपयांचे उत्पन्न; शेतकऱ्याचे आदर्श व्यवस्थापन

Beed News : बीडच्या आष्टी तालुक्यातील शिरपूर येथील सावनकुमार कल्याणराव तागड हे उच्चशिक्षित असून नोकरीच्या मागे न लागता त्यांनी शेतीमध्ये वेगळा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला
Farmer Success Story
Farmer Success StorySaam tv
Published On

बीड : बीड जिल्ह्यात दुष्काळी स्थिती असताना उपलब्ध पाण्याचा योग्य वापर केल्याने बीडच्या आष्टी तालुक्यातील शिरापूर येथील शेतकऱ्याने दोन एकर शेतीतून तब्बल ८ लाख रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे. अर्थात दुष्काळी परिस्थितीत देखील पाण्याचे योग्य नियोजन करून चांगले उत्पन्न घेत आहेत. 

Farmer Success Story
Water Scarcity : राज्यातील पाणीसाठा २२ टक्क्यांवर; पुणेकरांचीही चिंता वाढली, खडकवासला धरणात ५ टीएमसी पाणी

बीडच्या (Beed) आष्टी तालुक्यातील शिरापूर येथील सावनकुमार कल्याणराव तागड हे उच्चशिक्षित असून नोकरीच्या मागे न लागता त्यांनी शेतीमध्ये वेगळा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला होता. यातूनच त्यांनी आंब्याची लागवड केली. यासाठी त्यांनी सेंद्रिय पद्धतीचा अवलंब केला असून आता यातून त्यांना चांगले उत्पन्न मिळत (Farmer) आहे. झाडांना फळ धारणा चांगल्या प्रकारे झाल्याने केलेल्या मेहनतीचा उपयोग होत आहे. 

Farmer Success Story
Vitthal Rukmini Mandir : विठ्ठल-रुक्मिणी मंदिराला दान केलेले २८ किलो सोन्याचे‌ दागिने वितळवणार, त्याचं पुढे काय करणार?, जाणून घ्या

यावर्षी दुष्काळी स्थिती असतानाही ठिबक सिंचनच्या माध्यमातून त्यांनी (Mango) आंब्यांना पाणी दिले. याचे चांगले परिणाम आता दिसत असून त्यांना यावर्षी तब्बल ८ लाख रुपये यातून मिळणार आहेत. तर ग्रामीण भागातील तरुणांनी देखील छोट्या मोठ्या नोकरीसाठी शहराकडे धाव न घेता गावातच आपल्या शेतात वेगळा प्रयोग करून चांगले उत्पन्न घ्यावे; असे देखील आवाहन तागड यांनी केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com