Navapur News Saam tv
महाराष्ट्र

Navapur News : नवापूरमध्ये भाजपला धक्का; भरत गावितांचा मित्र पक्षात प्रवेश, निवडणूकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी

Nandurbar News : नंदुरबारच्या माजी खासदार माणिकराव गावित यांचे सुपुत्र भरत गावित हे नवापूर विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी आग्रही होते

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर प्रत्येक मतदार संघात राजकीय पक्षांची तयारी सुरु आहे. उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुकांची देखील भाऊगर्दी पाहण्यास मिळत आहे. अशातच काही नाराज पदाधिकारी पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश करत आहेत. अशाच प्रकारे नावापुरमधून भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने भरत गावित यांनी भाजपला रामराम ठोकत अजित पवार गटात प्रवेश केला आहे.

नंदुरबारच्या (Nandurbar) माजी खासदार माणिकराव गावित यांचे सुपुत्र भरत गावित हे नवापूर विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी आग्रही होते. यासाठी त्यांनी भाजपकडे उमेदवारीची मागणी देखील केली होती. मात्र उमेदवारी मिळत नसल्याचे चित्र पाहून त्यांनी भाजपला रामराम ठोकला आहे. यानंतर त्यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार व सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी अजित पवार पक्षात अधिकृत प्रवेश केला आहे.  

उमेदवारीबाबत अजूनही प्रश्नचिन्ह 

नवापूर (Navapur) विधानसभा मतदारसंघातून भरत गावित हे इच्छुक आहेत. दरम्यान भाजपकडून (BJP) उमेदवारीचे तिकीट मिळत नसल्याचे चित्र असल्याने त्यांनी अजित पवार गटात प्रवेश केला. मात्र पक्ष प्रवेश झाला असला तरी नवापूर विधानसभेसाठी त्यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळेल का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याने विकली किडनी, सावकारानेच दिला किडनी विकण्याचा सल्ला

महाविकास आघाडीत बिघाडी, ठाकरे बंधूंच्या युतीवर शिक्कामोर्तब

Poco C85 5G Launch: 50 मेगापिक्‍सल ड्युअल-कॅमेरा, 6000 mh बॅटरी; बाजारात पोकोचा धाकड सी 85 फोन लॉंच

Maharashtra Live News Update: पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे अजित पवार यांच्या भेटीला

Face care: डाग आणि पिग्मेंटेशन कमी करुन ग्लोईंग चेहरा हवाय; मग रात्री झोपताना घरी तयार केलेलं 'हे' होममेड सीरम नक्की लावा

SCROLL FOR NEXT