Nandurbar Lok Sabha
Nandurbar Lok Sabha Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar Lok Sabha : नंदुरबारमध्ये काँग्रेस उमेदवारांच्या अर्जावर भाजपचा आक्षेप; माहिती लपविल्याचा आरोप

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदूरबार : नंदुरबार लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार गोवाल पाडवी यांच्यासह के. सी. पाडवी आणि हेमलता पाडवी (Nandurbar) यांच्या उमेदवारी अर्जावर भाजपने आक्षेप घेतला आहे. काँग्रेस (Congress) उमेदवाराने अर्ज भरताना माहिती लपवली असल्याचा आरोप (BJP) भाजप उमेदवार डॉ. हिना गावित यांनी केला. यामुळे खळबळ उडाली आहे. (Maharashtra News)

नंदुरबार लोकसभा निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज छाननी असल्यामुळे छाननीसाठी सर्वच उमेदवार आले होते. यावेळी हिना गावित (Hina Gavit) यांनी गोवाल पाडवी यांच्यावर वेधलेले लक्ष चर्चेचा विषय झाला होता. गोवाल पाडवी, के. सी. पाडवी आणि हेमलता पाडवी हे तिघी एकमेकांवर अवलंबून आहेत; असं या उमेदवारी अर्जात नमूद करण्यात आलं असल्याने भाजपा उमेदवार हिना गावित यांनी आक्षेप घेतला आहे. परंतु हा विषय स्थानिक नसल्याने यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडे सुनावणी केली जाणार असून आम्ही कोर्टात जाणार असल्याच्या डॉ. हीना गावित यांनी सांगितलं,


('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

भाजप उमेदवार हिना गावित यांनी केलेले आरोप खोटे असून, हा विषय छाननीचा नव्हता. तरी देखील हिना गावित यांनी हा विषय घेतला. मात्र निवडणूक निर्णय अधिकारी निकाल सर्वांच्या बाजूने दिला असून सर्वे अर्ज हे वैध ठरवण्यात आले असल्याचे गोवाल पाडवी यांनी सांगितले. नंदुरबार लोकसभा निवडणुकीचे आज छाननी दरम्यान हिना गावित यांनी उमेदवार यांच्यावर माहिती लपवण्याच्या आणि प्रॉपर्टीची माहिती फेरफार करण्यात आले असता हा विषय तांत्रिक आहेत. मात्र सर्व विषयांची पूर्तता करून उमेदवारी अर्ज भरला आहे. याबाबत घेण्यात आलेल्या हरकती कायद्याने वैद्य आहेत. निवडणूक आयोगाने हरकती फेटाळले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Surya Namaskar Benefits : सूर्यनमस्कार करण्याचे फायदे जाणून घ्या

Washim Railway : शकुंतला रेल्वेचा ट्रॅकच गेला चोरीला, घटनेने खळबळ; नेमकं काय आहे प्रकरण?

Cow Bike Riding Video: सगळं काही शक्य! गायीने केली बाईक रायडिंग, VIDEO चा सोशल मीडियावर धुमाकूळ

PM मोदींनी चार टप्प्यांत 270 चा जागांचा टप्पा ओलांडला, अमित शहा यांचा दावा

Eggs : उकडलेली अंडी किती दिवस टिकतात?

SCROLL FOR NEXT