nandurbar  Saam tv
महाराष्ट्र

धाड धाड...! गावठी कट्ट्याने शेतात काम करणार्‍यावर गोळीबार; पोलीस तातडीने घटनास्थळी

nandurbar news : नंदूरबारमध्ये गावठी कट्ट्याने शेतात काम करणार्‍यावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. गोळीबाराच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

Vishal Gangurde

नंदूरबारमध्ये दिवसाढवळ्या गोळीबाराचा थरार

शेतात काम करणाऱ्या व्यक्तीवर गोळीबार

घटनेची माहिती मिळताच पोलीस पोहोचले घटनास्थळी

सागर निकवाडे,साम टीव्ही

राज्यात गोळीबाराच्या घटना सुरूच आहेत. पुण्यातील राजगड तालुक्यात गोळीबाराची घटना ताजी असताना नंदूरबारमधूनही गोळीबाराची घटना उघडकीस आली आहे. नंदूरबार शहरालगत असलेल्या बिलाडी शिवारात गोळीबाराची घटना घडली. गावठी कट्ट्याने शेतात काम करणाऱ्या एका व्यक्तीवर गोळीबार करण्यात आला आहे. गोळीबाराच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

नंदूरबारमध्ये झालेला गोळीबार हा आर्थिक वादातून झाल्याचे समोर आलं आहे. नंदूरबारच्या बिलाडी शिवारात गोळीबार झाल्यानंतर पोलीस आणि श्वानपथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. गोळीबार झालेल्या घटनास्थळाची पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी पाहणी केली. घटनास्थळी पोलिसांना गोळी झाडल्याचे पुरावे आढळले आहेत. पोलीस ॲक्शन मोडवर येत दोन जणांना ताब्यात घेतलं.

गोळीबारासाठी गावठी कट्टा कुठून आला, या संदर्भात पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोणीही अफवा न पसरवण्याचं पोलीस अधीक्षकांनी आवाहन केलं आहे.

पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी सांगितलं की, 'नंदूरबार तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोळीबाराची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच मी घटनास्थळी पोहोचले. ही जागा नंदूरबार तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत येते. या परिसरात गोळीबार झाल्याचे पुरावे मिळत आहेत. प्राथमिक माहितीनुसार, आर्थिक संबंधातून ही गोळीबाराची घटना घडली आहे, असं प्रशमदर्शनी दिसून येत आहे. पोलीस तपास सुरू आहे.

'पीडित व्यक्तीचा जबाब घेण्याचे काम सुरू आहे. त्यानुसार कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. माझं नागरिकांना आवाहन आहे की, कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नका. या प्रकरणी कारवाई सुरू असून आरोपींवर कडक कारवाई करण्यात येईल. सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोणीही अफवा पसरवू नये, असं आवाहन पोलीस अक्षीक्षकांनी केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पावसाळ्यात बनवा अळुच्या पानांची कुरकुरीत भाजी

एकाच दिवशी दोन दिग्गज नेत्यांचे निधन; भाजप- काँग्रेसवर कोसळला दु:खाचा डोंगर, राजकीय वर्तुळात हळहळ

Shocking : रात्री एकत्र जेवले, सकाळी मृतदेहच भेटला; प्रियकराच्या प्रेमात आंधळ्या झालेल्या पत्नीनं घेतला जीव

Paach Futaacha Bachchan: वारकरी परंपरेची अनोखी कथा मोठ्या पडद्यावर; 'पाच फुटाचा बच्चन' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Maharashtra News Live Update: निंबवली फाट्याजवळ उभ्या टेम्पोला भीषण आग

SCROLL FOR NEXT