पुण्यानंतर पिंपरी-चिंचवडमध्ये टेडी बेअरमध्ये बॉम्ब? गर्ल्स हॉस्टेलमध्ये उडाली खळबळ, पोलीस घटनास्थळी

Pimpri Chinchwad bomb scare : पुण्यानंतर पिंपरी-चिंचवडमध्ये टेडी बेअरमध्ये बॉम्ब असल्याच्या संशयाने खळबळ उडाली. यामुळे गर्ल्स हॉस्टेरबाहेर सर्वांची धावाधाव उडाली.
Pimpri Chinchwad news
Pimpri Chinchwad bomb scare Saam tv
Published On
Summary

हडपसरनंतर पिंपरी-चिंचवडमध्ये बॉम्ब असल्याचा संशय

बॉम्बच्या संशयाने गर्ल्स हॉस्टेलबाहेर तारांबळ

पिंपरी-चिंचवडच्या तुकारामनगरमध्ये घडला संपूर्ण प्रकार

पुण्यातील हडपसरमध्ये बॉम्ब आढळल्याची घटना ताजी असताना पिंपरी-चिंचवड शहरात टेडी बेअरमध्ये बॉम्ब असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. बॉम्ब असल्याच्या संशयाने गर्ल्स हॉस्टेलबाहेर पोलिसांची एकच तारांबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी बॉम्ब शोधक व नाशक पथकासह घटनास्थळी धाव घेतली.

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड शहरातील तुकाराम नगर परिसरात शुक्रवारी रात्री टेडी बेअरची दहशत पाहायला मिळाली. तुकाराम नगर येथील राजेश्वरी गर्ल्स हॉस्टेलबाहेर टेडी बेअरमध्ये बॉम्ब असल्याचा संशय हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या विद्यार्थिंनींना झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचं पथक घटनास्थळी पोहोचले.

Pimpri Chinchwad news
Bandar Teaser: लॉर्ड बॉबीचा रेट्रो लूक अन् डेटिंग अॅपचा घोटाळा; बंदरचा धमाकेदार टिझर रिलीज

पोलिसांच्या पथकासह बीडीडीएस पथक, डॉग स्कॉट आणि क्राइम ब्रँचचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी टेडी बेअर ची तपासणी सुरू केली. त्यानंतर टेडी बेअरमध्ये बॉम्ब नसल्याचे निष्पन्न झाले. गर्ल्स हॉस्टेलमधील एका विद्यार्थिनीला एका मोठ्या बॉक्समध्ये हा टेडी बिअर पार्सल आल्याची माहिती पोलिसांना काही काळानंतर समजली. त्यानंतर सर्वांनी अखेर सुटकेचा श्वास घेतला. मात्र या सर्व प्रकारामुळे राजेश्वरी गर्ल्स हॉस्टेलबाहेर विद्यार्थ्यांनी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. तसेच पोलिसांची देखील मोठी तारांबळ झाली.

Pimpri Chinchwad news
पुण्यातील रूग्णालयात टायमर बॉम्ब का ठेवला? आरोपीनं ATS ला शब्द ना शब्द सांगितलं, कारण ऐकूण पोलीस हादरले

पिंपरी-चिंचवडमध्ये गोळीबाराची घटना

पिंपरी-चिंचवड पुन्हा एकदा गोळीबाराच्या घटनेनं हादरलं आहे. दुचाकीवरून आलेल्या २ अज्ञातांनी फर्निचर मॉलवर अंधाधुंद गोळीबार केला. या गोळीबारानंतर लॉरेन बिश्नोई टोळीचा सदस्य शुभम लोणकरनं सोशल मीडियावर पोस्ट करत गोळीबाराची जबाबदारी घेतली आहे. त्यानं फर्निचर मॉलच्या मालकाला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. चाकीवरून आलेल्या दोघांनी दोन पिस्तुलातून पाच ते सहा गोळ्या फर्निचर मॉलवर झाडल्या आहेत.

तत्पूर्वी, काही दिवसांपूर्वी पुण्याच्या हडपसरमध्ये एका रुग्णालयाच्या परिसरात जिवंत बॉम्ब आढळला होता. या बॉम्बमुळे सर्वांची धावाधाव झाली होती. या प्रकरणात पोलिसांनी एकाला नागपूर रेल्वे स्टेशनवरून अटक केली आहे. आरोपी हा मूळचा सोलापूरचा असून पुण्यात वास्तव्यास होता. या प्रकरणात पोलिसांकडून आरोपीचे कसून चौकशी सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com