Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News : राज्यातील सर्वात गरीब म्हणून नंदुरबार जिल्हा पाहिल्यास्थानी; नीती आयोगाच्या सर्वेक्षणाचा अहवाल

Nandurbar News :नंदुरबार जिल्हा हा सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेला आहे. आदिवासी जिल्हा म्हणून नंदुरबार जिल्ह्याची देखील ओळख आहे

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : महाराष्ट्रातील सर्वात गरीब जिल्हा म्हणून नंदुरबार जिल्ह्याचे नाव समोर आले आहे. त्या पाठोपाठ नंदुरबार जिल्हा लगत असलेल्या धुळे जिल्हा देखील गरिबी रेषेखाली असल्याचं आता समोर आले आहे. निती आयोगाने देशभरात केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल नुकताच सादर करण्यात आलेला आहे. या सर्वेक्षणातून गरिबी निर्देशांक अहवाल प्रसिद्ध केला असून त्यात महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यात सर्वाधिक गरीब लोक असल्याचं समोर आला आहे.  

नंदुरबार (Nandurbar) जिल्हा हा सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेला आहे. आदिवासी जिल्हा म्हणून नंदुरबार जिल्ह्याची देखील ओळख आहे. स्थानिक ठिकाणी रोजगार नसल्यामुळे अनेक आदिवासी बांधव हे रोजगाराच्या शोधात राज्याच्या इतर ठिकाणी आणि गुजरात राज्यात रोजगारासाठी स्थलांतर होत असतात. यातच दारिद्र रेषेखालील असलेल्या आदिवासी बांधवांची संख्या देखील लक्षणीय असून आरोग्य शिक्षण आणि रोजगाराच्या या ठिकाणी मोठ्या समस्या असून येथील आदिवासी बांधवांच्या विकास हा खुंटलेला आहे.

नीती आयोग (Niti Ayog) नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सफॉर्मिंग इंडिया ही भारत सरकारची विकास धोरण ठरवणारी शिखर संस्था असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून नीती आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. या नीती आयोगाच्या सर्वेक्षण अहवालानुसार नंदुरबार जिल्ह्यात ३३.१७ टक्के नागरिक हे गरिबीचे जीवन जगत आहे. तर दुसरीकडे नंदुरबार जिल्ह्यात लागून असलेल्या धुळे जिल्ह्याचा गरिबी निदर्शकांत दुसरा क्रमांक आला असून धुळे जिल्ह्यातील २१. ४४ टक्के नागरिक हे दारिद्र्य रेषेखालील असल्याचा नीती आयोगाचा अहवालात नमूद करण्यात आलेला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: - विधान परिषद निवडणुकीची आज मतमोजणी, निकालाकडे सर्वांचे लक्ष

Monday Horoscope : रखडेलेली सर्व कामे पूर्ण होणार, कामगारांची होणार चांदीच चांदी; वाचा आजचे राशीभविष्य

Best Bus Strike: अखेर तोडगा निघालाच! बेस्टचा संप मागे, कर्मचाऱ्यांना मिळणार २००० रुपये मासिक हंगामी वाढ

ओमराजे निंबाळकरांचं अखेर ठरलं! ठाकरेंच्या मनधरणीच्या प्रयत्नांना अपयश

मुलीला वाचवण्यासाठी बाप बिबट्याशी भिडला; मृत्यूच्या जबड्यातून चिमुकलीची सुटका

SCROLL FOR NEXT