Beed Crime News : बीडमध्ये सिनस्टाईल थरार, चोरट्यांनी व्हॅनला बांधून एटीएम पळवलं; पोलिसांनी ६१ किमी पाठलाग करून पकडलं

Beed News : बीडच्या धारूर येथे शनिवारी हि धक्कादायक घटना घडली आहे. धारूर येथे असलेल्या एसबीआय बँकेचे एटीएम मशीन चोरून नेण्याचा प्रकार समोर आला आहे
Beed Crime News
Beed Crime NewsSaam tv

बीड : बीडच्या धारूर येथील एसबीआय बँकेचे एटीएम मशीन चार चोरांनी अवघ्या २ मिनिटात काढत व्हॅनला बांधून पळवल्याची घटना घडली. सदर घटनेची माहिती बँक कर्मचारी व पोलिसांना समजताच पोलिसांनी पाठलाग सुरु केला. यानंतर ६१ किलोमीटर पाठलाग करत एटीएम मशीन ताब्यात घेतले आहे.

Beed Crime News
Sambhajinagar News : विनापरवाना, जादा दराने कापूस बियाणे विक्री; २८ कृषी केंद्रांवर परवाना रद्दची कारवाई

बीडच्या (Beed) धारूर येथे शनिवारी हि धक्कादायक घटना घडली आहे. धारूर येथे असलेल्या एसबीआय बँकेचे एटीएम मशीन चोरून नेण्याचा प्रकार समोर आला आहे. चार चोरटयांनी एटीएम मध्ये येत मशीन न तोडता ते दोरीच्या सहाय्याने गाडीला बांधले. यानंतर हे मशीन घेऊन चोरटे पसार झाले. एटीएम (ATm) मशीन पळवून घेऊन जातानाचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात देखील कैद झाले होते. हा प्रकार बँक कर्मचाऱ्याच्या लक्षात आल्यानंतर पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. 

Beed Crime News
Vitthal Mandir : आषाढीला भाविकांना दिसेल मंदिराचे मूळ रूप; विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्याचे काम पूर्ण

आरोपी मात्र फरार 

पोलिसांनी (Police) पाठलाग करत साधारण ६१ किलोमीटर अंतरावर बीडच्या गेवराई परिसरातील जायकवाडी शिवारात असलेल्या पत्र्याच्या शेडमधून अखेर एटीएम मशीन जप्त केली आहे. विशेष म्हणजे या मशीनमधील २१ लाख १३ हजार ७०० रुपयांची रोकड परत आणली. धारूरचे पोलिस निरीक्षक देविदास वाघमारे यांनी कर्मचाऱ्यांसह ही कारवाई केली असून फरार असणाऱ्या चार आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com