Nandurbar Witchcraft News Saam TV
महाराष्ट्र

Nandurbar News: डाकिन असल्याच्या संशयावरून महिलेला बेदम मारहाण; नंदुरबारमधील संतापजनक घटना

Witchcraft Crime News: धडगाव तालुक्यातील तलावडी शिवार पाडा येथे डाकिन असल्याची अफवा पसरली होती. तलावडी गावात शिवार पाडा येथे एक ३२ वर्षीय आदिवासी महिला राहते. तिच्यावर संशय घेऊन तिला मारहाण करण्यात आलीये.

Ruchika Jadhav

सागर निकवाडे

Nandurbar Crime:

नंदुरबारमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका आदिवासी महिलेला डाकिन असल्याच्या संशयावरून मारहाण करण्यात आली आहे. मारहाण करणाऱ्या पती-पत्नी विरोधात जादूटोणा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, धडगाव तालुक्यातील तलावडी शिवार पाडा येथे डाकिन असल्याची अफवा पसरली होती. तलावडी गावात शिवार पाडा येथे एक ३२ वर्षीय आदिवासी महिला राहते. तिच्यावर संशय घेऊन तिला मारहाण करण्यात आलीये.

तू डाकीण आहेस आणि तू आमच्या मुलांना मारून टाकलं. आमच्या घरातील जनावरांनाही तू खाऊन टाकशील असं म्हणत एका दाम्पत्याने महिलेला मारहाण केली. तसेच तिला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून मारहाण करणाऱ्या पती-पत्नी विरोधात महाराष्ट्र जादूटोणा अधिनियम कलमाअंतर्गत जळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनेक व्यक्ती आजही भूत, जादूटोणा आणि काळी शक्ती अशा अंधश्रद्धांवर विश्वास ठेवतात. अंधश्रद्धेमुळे आजवर अनेक विचित्र घटना समोर आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी औरंगाबादमध्ये जादूटोणा केल्याच्या संशयातून हत्या करण्यात आली होती. जादूटोणा केल्याने माझ्या व्यवसायात नुकसाने असे आरोपी व्यक्तीला वाटले आणि त्यांने संबंधित व्यक्तीची हत्या कोली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohtang Accident : भरधाव कार दरीत कोसळली; ४ जणांचा जागीच मृत्यू, वाहनाचा अक्षरश: चक्काचूर

Maharashtra Live News Update: प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नारायणगडावर भक्तांनी घेतले विठुरायाचे दर्शन

Pune : पुण्यात कोयता, हातोड्याने मारहाण; कॉलेजमध्ये झाला राडा! हाणामारीचे Video Viral

Shahapur : अखेर चौथ्या दिवशी सापडला युवकाचा मृतदेह; भारंगी नदीत बुडून झाला मृत्यू

Skin Care: सतत खोट्या आयलॅशेस लावण्याने होतील हे नुकसान, वेळीच व्हा सावधान

SCROLL FOR NEXT