Shahad Police Station Saam Tv
महाराष्ट्र

संतापजनक! पाडळदा येथे १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार

नराधमाविरोधात पोलिसात गुन्हा दाखल

दिनू गावित, साम टीव्ही नंदूरबार

नंदुरबार - शहादा (Shahada) तालुक्यातील पाडळदा येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची हृदयदावक घटना घडली आहे. यामुळे परिसरात चर्चेला उधाण आले आहे. १२ जुलै २०२२ रोजी १२ वाजेच्या सुमारास एक १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी घरात एकटी असतांना एका नराधमाने घरात घुसुन अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला व तिला जिवे ठार मारण्याची धमकी दिली.

हे देखील पाहा -

तसेच दिनांक १४ जुलै २०२२ रोजी ११ वाजेच्या सुमारास मुलगी घरात एकटी असतांना नराधमाने घरात घुसुन विनयभंग केला व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. मुलगी अल्पवयीन आहे हे माहीत असताना देखील नराधमाने दोन वेळेस तिच्यावर लैंगिक अत्याचार केला म्हणुन संबधीत मुलीने आरोपी विरूद्ध स्वतः शहादा पोलीस स्टेशन येथे जावून फिर्याद दिली आहे.

मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 470/2022 भादवी कलम 376, 354, 452, 506 लैंगिक अपराध संरक्षण अधिनियम 4, 8, 12 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी संभाजी सावंत व शहादा पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांनी भेट दिली आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरिक्षक माया राजपूत हे करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तीन भावांची ‘आदर्श’ शेतवाटणी, अनोख्या शेतवाटणीची राज्यभरात चर्चा; कौटुंबिक बंध जपणारा निर्णय

Donald Trump : जगभरातील १०० देशांत लागू होणार ट्रम्प यांचा नवा टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?

Yavatmal News : बायकोसोबत शेतात गेले, 'मी नंतर येतो' सांगून रानातच थांबले; बातमी आली की...

Akash Deep : आकाश दीपने इंग्लंडमध्ये 'पंजा' खोलला, पाचव्या विकेटनंतर मैदानावरच रडू कोसळलं

Kiwi: किवी खाण्याचे 'हे' आरोग्यदायी फायदे माहितीये का?

SCROLL FOR NEXT