nanded news  Saam tv
महाराष्ट्र

चाललंय काय? नांदेडमध्ये भर रस्त्यात गोळीबाराचा थरार; आरोपीने थेट पोलिसांवरच झाडल्या गोळ्या

nanded shocking : नांदेडमध्ये भर रस्त्यात गोळीबाराचा थरार घडला. हत्या केलेल्या आरोपीने थेट आरोपीने थेट पोलिसांवरच गोळ्या झाडल्याची घटना घडली आहे.

Saam Tv

नांदेडमध्ये तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली

हत्या करणाऱ्या आरोपींनी पोलिसांवर गोळीबार केलाय

चकमकीत एका पोलीस कर्मचाऱ्या दुखापत झाली

नांदेडमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या गुन्ह्यांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. नांदेडमध्ये आज सोमवारी पहाटे एका तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. हत्या झाल्यानंतर पोलिसांकडून आरोपींचा पाठलाग करण्यात येत होता. मात्र, त्याचवेळी आरोपींनी थेट पोलिसांवर गोळीबार केला आहे. आरोपींनी केलेल्या गोळीबारात पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. गोळीबाराच्या या घटनेत परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

नांदेड शहर हत्येचे हब बनल्याची टीका होऊ लागली आहे. नांदेडमध्ये मागील दोन दिवसांत ५ जणांच्या हत्या झाल्या आहेत. शहरात आज सकाळी ६ वाजता देखील एका तरुणाची हत्या झाली. २५ वर्षीय सोनू कल्याणकरची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. भर रस्त्यात तीन ते चार मारेकऱ्यांनी सोनू कल्याणकरला गाठलं. त्यानंतर त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केले.

धारदार शस्त्राने वार केल्याने सोनू कल्याणकरचा मृत्यू झाला. सोनू कल्याणकरवर तीन वर्षांपूर्वी देखील जीवघेणा हल्ला झाला होता. रींदा गँगच्या गोलू मंगनाळे याने गोळीबार केला होता. गोलू मंगनाळे सध्या तुरुंगात आहे. त्यानंतर आज चौघांनी कल्याणकरला संपवलं. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी आरोपींचा पाठलाग केला. पण त्यावेळी आरोपींनी पोलिसांवर गोळीबार केला.

आरोपींनी गोळ्या झाडल्यानंतर स्वरक्षणार्थ पोलीसांनी आरोपीवर गोळी झाडली. या चकमकीत पोलीस कर्मचारी अंकुश गंधमवार गोळीबारात जखमी झाला. या प्रकरणात पोलिसांनी ४ आरोपींना अटक केली आहे.

नांदेडमध्ये ४८ तासांत ५ जणांच्या हत्या

नांदेडमधील सोनू कल्याणकर हा तरुण सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करत होता. तो शिवसेनेचा कार्यकर्ता होता. त्याच्या हत्येचा तपास सुरू आहे. शुक्रवारी रात्री गॅंगवॉर मधून नांदेडमध्ये तीन जणांचा खून झाला. पुन्हा 24 तासात शनिवारी रात्री शहरातील मुरमुरा गल्लीत रंजित सिंघ तबेलेवाले या तरुणाचा खून झाला.आणि आज सकाळीं सोनू कल्याणकर या तरुणाचा खून करण्यात आला. 48 तासात नांदेड शहरात पाच खून झाल्याने कायदा आणि सुवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT