Nanded Politics Saam Tv
महाराष्ट्र

Nanded: राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचं अपहरण अन् बेदम मारहाण, अजितदादांच्या आमदारावर गंभीर आरोप; घटनेचा VIDEO समोर

Nanded Politics: नांदेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचं अपहरण करत त्यांना बेदम मारहाण करण्यात आली होती. पोलिसांनी या नेत्याची सुटका केली असून ७ जणांना अटक केली. या नेत्याने अजितदादांच्या आमदारावर गंभीर आरोप केला आहे.

Priya More

Summary -

  • नांदेडमध्ये राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचं अपहरण करण्यात आले

  • सिडको परिसरात भरदिवसा कार आडवी लावून राष्ट्रवादीच्या नेत्याला मारहाण करण्यात आली

  • मारहाण केल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्याला कारमध्ये कोंबून नेल्याचा आरोप

  • या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे

  • अजितदादांच्या आमदार आणि माजी आमदारांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत

संजय सूर्यवंशी, नांदेड

नांदेडमध्ये राजकारण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस जीवन घोगरे पाटील यांना मारहाण करत अपहरण करण्यात आले होते. या अपहरण प्रकरणाला राजकीय वळण आले आहे. राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर आणि माजी आमदार मोहन हंबर्डे यांनी अपहरण करायला लावल्याचा आरोप करण्यात आला आहे. आर्थिक व्यवहार आणि राजकीय हेतूने हा प्रकार घडल्याचा आरोप आहे. अपहरण करणाऱ्या सात आरोपींना पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे नांदेडमध्ये खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नांदेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस जीवन घोगरे पाटील यांचे अपहरण करण्यात आले होते. पोलिसांनी त्यांची तातडीने सुटका केली. मात्र या अपहरण प्रकरणाला राजकीय वळण आले आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर त्याचे पुत्र प्रवीण पाटील चिखलीकर आणि माजी आमदार मोहन हंबर्डे यांनी माझं अपहरण करून मारहाण करायला लावली असा आरोप जीवन घोगरे पाटील यांनी केला आहे. पोलिसांना त्यांनी तशी फिर्याद देखील दिली.

आमदार प्रताप पाटील चिखलीकर आणि माजी आमदार मोहन हंबर्डे त्यांच्यासोबत आपला दोन कोटीचा आर्थिक व्यवहार होता. तसंच राजकीय हेतूने हा प्रकार घडला असा जीवन पाटील यांचा आरोप आहे. मागील एका वर्षापासून मला धमक्या येत होत्या. मानसिक आणि राजकीय त्रास दिला जात होता. याबाबत मुख्यमंत्री, पोलिस महासंचालक आणि स्थानिक पोलीस प्रशासनाल तक्रार दिली असून संरक्षण देण्याची मागणी देखील केली होती, असा दावा जीवन घोगरे पाटील यांनी केला.

दरम्यान सोमवारी सकाळी साडे अकरा वाजता सिडको भागातून जीवन घोगरे पाटील यांचे अपहरण करण्यात आले होते. जीवन घोगरे पाटील त्यांच्या कारमधून जात असताना त्याच्या कारसमोर दुसरी कार आडवी लावण्यात आली. त्या कारमधील ६ जणांनी मारहाण करून त्यांना कारमध्ये कोंबून अपहरण करून नेले.

हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला होता. त्यानंतर पोलिसांनी पाठलाग करून त्यांची सुटका केली. अपहरण करणाऱ्या सात जणांना नांदेड ग्रामीण पोलिसांनी अटक केली. तसंच, अपहरण करण्यासाठी वापरण्यात आलेली कार देखील जप्त करण्यात आली. मात्र अपहरण प्रकरणात जीवन घोगरे पाटील यांनी राजकीय नेत्यांची नाव घेतल्याने या प्रकरणाला राजकीय वळण लागले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RBI Recruitment: रिझर्व्ह बँकेत नोकरीची संधी; या पदांसाठी भरती होणार; अर्ज कुठे अन् कसा करावा?

Shilpa Shetty : सेम टू सेम! अक्षय खन्नाच्या गाण्यावर थिरकली शिल्पा शेट्टी; हुक स्टेप्सनं वेधलं लक्ष, VIDEO

लोकलमधील धोकादायक प्रवास आता इतिहासजमा होणार; रेल्वे प्रशासनाची अनोखी शक्कल|VIDEO

Maharashtra Live News Update: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार; या तारखेला करणार युतीची घोषणा

Rice And Diabetes: भात खाल्ल्यानं खरंच डायबेटिस होतो? २ अक्षरांचं उत्तर अन् मनातली शंका होईल काही मिनिटांत दूर

SCROLL FOR NEXT