Crop Insurance Saam tv
महाराष्ट्र

Crop Insurance : जिल्हा प्रशासनाचा नुकसानीचा अहवाल विमा कंपनी नाकारला; फळबागांचा विमा मिळणे झाले अवघड

Nanded News : अनेक ठिकाणी प्रति तास ४० किलोमीटरपेक्षा कमी वेगाने वारे वाहिल्याची वेदर स्टेशनमधील नोंद आहे. तर प्रत्यक्षात ४० किलोमीटरपेक्षा जास्त वेगाने वारे वाहिल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाने दिला

Rajesh Sonwane

संजय सूर्यवंशी 
नांदेड
: पिकांचे वादळी वारा, तसेच अतिवृष्टीने नुकसान झाल्यास त्याची भरपाई मिळण्यासाठी शेतकऱ्यांकडून पीक विमा काढण्यात येत असतो. अर्थात नुकसानीप्रमाणे शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळत असते. मात्र वादळी वाऱ्यात नुकसान झाल्यानंतर त्यांच्या पंचनाम्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेला अहवाल विमा कंपन्यांनी नाकारला आहे. यामुळे आता शेतकऱ्यांना भरपाई मिळणे कठीण झाले आहे. 

नांदेड जिल्ह्यात जून महिन्यात वादळी वाऱ्यामुळे सुमारे ४ हजार हेक्टरवरील केळी, पपई आणि इतर फळबागायतींचे मोठं नुकसान झालं आहे. जिल्हा प्रशासनाने पंचनामे करून नुकसानीचा अहवाल पीक विमा कंपनीला सादर केला. मात्र विम्याची रक्कम मिळणं शेतकऱ्यांसाठी अवघड झालं आहे. यामुळे शेतकऱ्यांनी विमा उतरविल्यानंतर देखील शेतकऱ्यांना याचा उपयोग होत नसल्याचे नांदेड जिल्ह्यात पाहण्यास मिळत आहे. 

वेदर स्टेशनमधील नोंद ठेवली ग्राह्य 

दरम्यान पीक विमा कंपनीने प्रत्यक्ष नुकसानी ऐवजी वेदर स्टेशनमध्ये नोंद झालेल्या वाऱ्याच्या वेगाला ग्राह्य धरलं आहे. अनेक ठिकाणी प्रति तास ४० किलोमीटरपेक्षा कमी वेगाने वारे वाहिल्याची वेदर स्टेशनमधील नोंद आहे. तर प्रत्यक्षात ४० किलोमीटरपेक्षा जास्त वेगाने वारे वाहिल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाने दिला होता. त्यामुळे, जिल्हा प्रशासन नुकसान भरपाईसाठी सकारात्मक असतानाही, पीक विमा कंपनी आपल्या नियमांवर ठाम असल्याने शेतकऱ्यांना भरपाई मिळण्यात अडचणी येत आहेत. 

या दरम्यान विमा कंपनीने वेदर स्टेशनमधील नोंद ग्राह्य धरल्यामुळे जिल्हा प्रशासनाचा अहवाल नामंजूर करण्यात आला आहे. यामुळे, आधीच नैसर्गिक आपत्तीने त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. तर नांदेड जिल्ह्यात ४ हजार हेक्टर वर केळी, पपई इतर फळबागायत पिकांचे जून मध्ये नुकसान झाले आहे. अशा परिस्थिती आता शेतकर्याना नुकसान सहन करावे लागणार आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yogesh Kadam : आधी पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख वाचला; नंतर गृहराज्यमंत्र्यांनी गुन्हे रोखण्याचा सरकारचा 'राणबाण उपाय'च सांगितला

Akola Shocking : दिवसभर ५ वर्षांचा चिमुकला बेपत्ता, नंतर सांडपाण्याकडे लक्ष गेलं; दृश्य पाहून कुटुंब हादरलं

Raj Thackeray : महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी का भांडतोय? राज ठाकरेंचा थेट सवाल

Raj Thackeray : 'मुंबईतल्या समुद्रात डुबे डुबे के मारेंगे'; राज ठाकरेंची भाजप खासदार निशिकांत दुबेंना वार्निंग

Ganapati Special Trains : चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी, गणेशोत्सवानिमित्ताने मध्य रेल्वे चालवणार २५० विशेष गाड्या

SCROLL FOR NEXT