Fraud : सेंद्रिय खत विक्रीच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक; तुमसर तालुक्यातील प्रकार

Bhandara News : खताची बॅग ९०० रुपये दराने अवैधरित्या विक्री व‌ बोगस बिल देऊन केल्याचे कारवाईत उघड झाले. सदर कारवाईत अवैधरीत्या खत विक्री करणाऱ्या ट्रक मधुन ४७ खताची बॅग व ट्रक जप्त करण्यात आला
Bhandara News
Bhandara NewsSaam tv
Published On

शुभम देशमुख 
भंडारा
: शेतकरी रासायनिक तसेच सेंद्रिय खत खरेदी करत आहे. मात्र गोदावरी गोल्ड सेंद्रिय खत विक्रीच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला आहे. गोदावरी गोल्ड सेंद्रिय कंपनीच्या नावाखाली अनधिकृत खत विक्री करत हि फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी कंपनी मालक, प्रतिनिधी विरोधात मोहाडी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील मांढळ/परसवाडा येथील प्रकार आहे. दरम्यान गोदावरी फर्टीलाईझर या खत कंपनीकडून व त्यांच्या प्रतिनिधी कडुन बोगस अवैधरित्या परवाना विना गोदावरी गोल्ड सेंद्रिय खत विक्री करुन शेतकऱ्यांच्या घरोघरी जाऊन दोनशे रुपयाची बॅग नऊशे रूपयात विक्री केल्याचा प्रकार मांढळ येथे समोर आला. येथे सदर कंपनीच्या माध्यमातून तब्बल पाचशे शेतकऱ्यांची फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे.

Bhandara News
Baramati: कामाचा ताण असह्य; मॅनेजरची बँकेतच आत्महत्या, चिठ्ठीतून धक्कादायक माहिती उघड

कंपनी मालक व प्रतिनिधींवर गुन्हा दाखल 

सदर प्रकरणी खत नियंत्रण १९८५ अंतर्गत बोगस अवैधरित्या सेंद्रिय खत विक्री करणाऱ्या कंपनीविरोधात व मालक शेख अब्दुल कादर (रा. छत्रपती संभाजीनगर) व त्यांचे प्रतिनिधी पवन टिकले व अजय गुल्हाणे (रा.ता.नरखेड जि.नागपुर) व उमंग कृषी सेवा केंद्र तिरोडा यांच्या विरोधात कृषी अधिकारी गुण नियंत्रण होमराज धांडे, अभिजित पटवारी,विकास सोनवाने यांच्या तक्रारीवरून मोहाडी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील गोदावरी गोल्ड कंपनीचे प्रतिनिधी पवन टिकले व अजय गुल्हाणे यांना मोहाडी पोलीसांनी अटक केली आहे. तर मालक शेख अब्दुल कादर व उमंग कृषी केंद्र तिरोडा यांच्या मागावर आहेत.

Bhandara News
Ambarnath : चोरी करायला येताच रंगेहात पकडले; नागरिकांनी धु धु धुतले, चोरट्यांना दिले पोलिसांच्या ताब्यात

४७ खतांच्या बॅगा जप्त 

सदर कारवाई कृषी अधिकारी गुण नियंत्रण होमराज धांडे, भरारी पथक विकास सोनवाने, अभिजित पटवारी यांच्या नेतृत्वाखाली केली असुन ट्रकमधुन खतांची विक्री होत होती. सदर खताची बॅग ९०० रुपये दराने अवैधरित्या विक्री व‌ बोगस बिल देऊन केल्याचे कारवाईत उघड झाले. सदर कारवाईत अवैधरीत्या खत विक्री करणाऱ्या ट्रक मधुन ४७ खताची बॅग व ट्रक जप्त करण्यात आला आहे. त्याची किंमत ६८ हजार १५० ईतकी आहे. सदर घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक सुरेंद्र बेलखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहाडी पोलीस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com