Dragon Fruit Farming : यूट्यूब पाहून शेतकऱ्याने फुलवली समृद्धी; नंदुरबारमधील शिंदे गावात ड्रॅगन फ्रूटची यशस्वी प्रयोग

Nandurbar News : एकरी तीन लाख रुपये खर्च आला. तर पहिल्या वर्षी त्यांना पाच एकरमध्ये पाच टन ड्रॅगन फ्रुट झाले. दुसऱ्या वर्षी दहा टन उत्पन्न निघाले. तर यंदा आतापर्यंत दहा टन फळे निघाले
Dragon Fruit Farming
Dragon Fruit FarmingSaam tv
Published On

सागर निकवाडे 
नंदुरबार
: शेतीत नवीन प्रयोग करून शेतीतून चांगले उत्पादन घेण्याकडे शेतकरी वळत आहे. यात युट्युब पाहून शेतीत यशस्वी प्रयोग करण्याचे काम नंदुरबार तालुक्यातील शिंदे येथील शेतकरी प्रकाश पटेल यांनी केले आहे. यूट्यूबवर बघून ड्रॅगन फ्रुटची शेतीचा यशस्वी प्रयोग केला आहे. यातून चांगले उत्पादन मिळत असून यंदाच्या वर्षात सुमारे ४५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे. 

महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवर असलेल्या नंदुरबार तालुक्यातील शिंदे येथील ४५ वर्षीय शेतकरी प्रकाश शिवदास पटेल यांनी अडीच वर्षांपूर्वी त्यांच्या पाच एकर शेतात कलमांपासून ड्रॅगन फ्रुटची लागवड केली. सुरुवातीला त्यांना एकरी तीन लाख रुपये खर्च आला. तर पहिल्या वर्षी त्यांना पाच एकरमध्ये पाच टन ड्रॅगन फ्रुट झाले. दुसऱ्या वर्षी दहा टन उत्पन्न निघाले. तर यंदा आतापर्यंत दहा टन फळे निघाले असून यंदाच्या हंगामात ३० ते ३५ टन ड्रॅगन फ्रुट निघण्याचा अंदाज आहे. 

Dragon Fruit Farming
Ambarnath : चोरी करायला येताच रंगेहात पकडले; नागरिकांनी धु धु धुतले, चोरट्यांना दिले पोलिसांच्या ताब्यात

महाराष्ट्रासह गुजराजमध्येही फळ विक्री 

महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नंदुरबार तसेच गुजरात राज्यातील सुरत, बडोदा व अहमदाबाद येथील बाजारपेठ त्यांना उपलब्ध असल्याने १४० ते १५० रुपये किलोने ते व्यापाऱ्यांना विक्री करतात. पहिल्या वर्षी या पिकाला अधिकचा खर्च येत असला तरी पुढील पंधरा वर्षे अल्प खर्च आहे. त्यामुळे त्यांना पाच एकर मध्ये यंदा ४५ लाखापेक्षा अधिक उत्पन्न होणार आहे. त्यांनी युट्युब वरून ड्रॅगन फ्रुटची शेती कशी करावी? हे शिकून शेती करत पश्चिम बंगाल मधून रोप आणली होती. पाच एकरात त्यांनी दहा हजार रोपांची लागवड केली. दरवर्षी ड्रॅगन फ्रुटचे उत्पन्न वाढत जाते. कमी पाण्यात हे फळ येत असून मजूर कमी लागत असल्याने शेतकऱ्यांसाठी ड्रॅगन फ्रुटची शेती वरदान ठरली आहे.

Dragon Fruit Farming
Fraud : सेंद्रिय खत विक्रीच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक; तुमसर तालुक्यातील प्रकार

प्रकाश पटेल या ४५ वर्षीय शेतकऱ्याचे बारावीपर्यंत शिक्षण झाले आहे. त्यांनी युट्युब वरून ड्रॅगन फ्रुटची शेती केली. त्यांचे एकत्र कुटुंब असून त्यांना शेतीत त्यांची मोठी मदत होते. ड्रॅगन फ्रुटची शेती केली. त्या शेतीतूनच कलम त्यांनी तयार करून नवीन पाच एकर मध्ये लागवड केली. त्यामुळे त्यांचे सुमारे सहा लाख रुपये वाचले. या शेतकऱ्याचा कष्टाला आता गोड फळे आले आहेत. उन्हाळ्यात ते या पिकासाठी नेट लावून त्याची निगा राखतात. या शेतकऱ्यांमुळे अनेकांना त्याची प्रेरणा मिळत असून त्यांची ड्रॅगन फ्रुटची शेती पाहण्यासाठी अनेक शेतकरी त्या ठिकाणी भेट देत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com