Ashok Chavan Saam tv
महाराष्ट्र

Ashok Chavan News : ते विधान चुकीचे व हास्यास्पद; राहुल गांधी यांच्या विधानावर अशोक चव्हाण यांचे उत्तर

Nanded News : मुंबईत १७ मार्चला झालेल्या इंडिया आघाडीच्या सभेत राहुल गांधी यांनी नाव न घेता एक काँग्रेस नेता भीतीपोटी भाजपमध्ये गेल्याचे म्हणाले होते.

Rajesh Sonwane

संजय सूर्यवंशी

नांदेड : मी कधीही सोनिया गांधी यांना भेटलो नाही आणि माझी भावना व्यक्त केली नाही. यामुळे (Nanded) राहुल गांधी यांचे विधान माझ्या संदर्भात असेल तर ते हास्यास्पद आहे. त्यांचे हे विधान चुकीच आहे; अशी प्रतिक्रिया खासदार अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी दिली. (Live Marathi News)

मुंबईत १७ मार्चला झालेल्या इंडिया आघाडीच्या सभेत राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी नाव न घेता एक काँग्रेस नेता भीतीपोटी (BJP) भाजपमध्ये गेले असून, त्या नेत्याने आपल्या आईसमोर रडून व्यथा मांडल्याचे ते म्हणाले. यावर अशोक चव्हाण यांनी उत्तर देताना सांगितले. मी सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना भेटलो नाही. त्यामुळे मी सोनिया गांधी यांना भेटून माझी भावना व्यक्त केल्याचे विधान चुकीचे आणि दिशाभूल करण्यासारखं असल्याचे अशोक चव्हाण म्हणाले. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

म्हणूनच भाजपमध्ये प्रवेश 

शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेस (Congress) पक्षाचे काम करत होतो. मी पक्ष सोडेपर्यंत ही माहिती कोणालाही नव्हती ही वास्तव आहे; असं चव्हाण म्हणाले. त्यामुळे राहुल गांधी यांचे विधान माझ्या संदर्भात असेल तर ते चुकीचं आहे. असं अशोक चव्हाण म्हणाले. दरम्यान काँग्रेसचे नव्हे तर इतर पक्षाचे नेते भीती पोटी भाजप प्रवेश करत असल्याचे चव्हाण यांना विचारले असता इतरांबद्दल मी बोलणार नाही. प्रश्न माझ्याबाबत आहे. पण मी निर्णय घेताना भाजपचे भविष्य आणि भावि्तव्य असल्यामुळे भाजपमध्ये प्रवेश केल्याचे अशोक चव्हाण म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dharmarakshak Mahaveer Chhatrapati Sambhaji Maharaj : 'आईविना जगण किती अवघडं असतं' धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज ट्रेलर प्रदर्शित

घरबसल्या अनुभवा ॲक्शनचा धमाका; 'Kanguva' आता ओटीटीवर, कधी अन् कुठे पाहाल

Wedding Rituals Varmala Cermony: लग्नात वर-वधूला वरमाला का घालतात? नेमकं कारण काय, जाणून घ्या...

हे आहेत डोके आणि मानेचे प्रमुख कर्करोग, प्रतिबंधासाठी जीवनशैलीत करा हे बदल...

IND vs AUS: टीम इंडियाला दुखापतींचं ग्रहण, विराट गेला होता हॉस्पिटलमध्ये, सरावावेळी २ फलंदाज जायबंदी

SCROLL FOR NEXT