Chhatrapati Sambhajinagar News: धक्कादायक! पिसाळलेल्या घोड्याचा वृद्ध दांपत्यासह ६ जणांवर हल्ला; परिसरात खळबळ

Chhatrapati Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगरच्या वडवाळी शिवारात पिसाळलेल्या घोड्याने धुमाकूळ घालून वृद्ध दाम्पत्यासह पाच ते सहा जणांवर हल्ला करून चावा घेत जखमी केल्याची घटना घडली आहे.
Ghati Hospital News
Ghati Hospital NewsSaamtv
Published On

राम ढाकणे, छत्रपती संभाजीनगर|ता. १८ फेब्रुवारी २०२४

Chhatrapati Sambhajinagar News:

छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या वडवाळी शिवारात पिसाळलेल्या घोड्याने धुमाकूळ घालून वृद्ध दाम्पत्यासह पाच ते सहा जणांवर हल्ला करून चावा घेत जखमी केल्याची घटना घडली आहे. या प्रकाराने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

आतापर्यंत आपण पिसाळलेल्या कुत्र्याने, माकडाने चावा घेतल्याचे ऐकलं होतं. परंतु छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) वडवाळी शिवारात पिसाळलेल्या घोड्याने धुमाकूळ घालून वृद्ध दाम्पत्यासह पाच ते सहा जणांवर हल्ला करून चावा घेत जखमी केले. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.

नरहरी गायकवाड व सुमनबाई नरहरी गायकवाड असे गंभीर जखमी वृद्ध दाम्पत्याचे नाव असून इतरांची नावे कळू शकली नाही. वडवाळी शिवारातील पांडुरंगनगरमध्ये नरहरी गायकवाड कुटुंबासह राहतात. शुक्रवारी ते व त्यांची पत्नी सुमनबाई हे दोघे घरी असताना परिसरात धुमाकुळ घालत आलेल्या एका पिसाळलेल्या घोड्याने सदर वृद्ध दाम्पत्यावर हल्ला करून चावा घेत गंभीर जखमी केले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Ghati Hospital News
Maval: मावळ मतदारसंघात महायुतीमध्ये रस्सीखेच; राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांची नरमाईची भूमिका

त्यानंतर हा घोडा दुसऱ्या भागात गेला. तेथेही त्याने पाच ते सहा जणांना चावा घेतला. दरम्यान, या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले गायकवाड दाम्पत्याला ग्रामस्थांनी पैठण येथील सरकारी दवाखान्यात दाखल केले. येथ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. (Latest Marathi News)

Ghati Hospital News
Maval: मावळ मतदारसंघात महायुतीमध्ये रस्सीखेच; राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांची नरमाईची भूमिका

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com