Maval: मावळ मतदारसंघात महायुतीमध्ये रस्सीखेच; राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांची नरमाईची भूमिका

Maval Lok Sabha Constituency : तर काही दिवसांपूर्वी विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना विरोध करणारे आमदार शेळके यांनी नरमाईची भूमिका घेतल्याने मावळ तालुक्यात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
Maval
MavalSaam TV
Published On

दिलीप कांबळे

Maval Lok Sabha Election :

मावळ लोकसभा मतदारसंघात उमेदवारीवरुन महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू आहे. विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना भाजपसह राष्ट्रवादीकडून कडाडून विरोध होत आहे. मात्र आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांनी आता नरमाईची भूमिका घेतली आहे.

महायुतीतून अद्याप कुणाचीही उमेदवारी जाहीर झालेली नाही. यादी देखील प्रसिद्ध झालेली नाही. प्रत्येक इच्छुक उमेदवार उमेदवारी मिळण्यासाठी ताकद लावत असतो. अशात महायुतीचा जो उमेदवार ठरेल तो आम्हाला मान्य असेल. आम्ही त्याचं काम हातात हात घेऊन करू, अशी नरमाईची भूमिका शेळके यांनी घेतली आहे. तर काही दिवसांपूर्वी विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना विरोध करणारे आमदार शेळके यांनी नरमाईची भूमिका घेतल्याने मावळ तालुक्यात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

एकीकडे महायुतीमधून शिंदे गटाचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांचे नाव चर्चेत येताच मावळ तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांच्या भावना अनावर झाल्या. माझी राज्यमंत्री बाळा भेगडे यांना महायुतीतून मावळ लोकसभा उमेदवारी द्यावी असा आग्रह भाजप कार्यकर्त्यांनी केला.

दहा वर्षात फक्त महायुती म्हणून उपयोग करून घेतला. मात्र कधीच विश्वासात घेतले नाही. तर यासाठी भाजपच्या निष्ठावानांनी बाळा भेगडे यांच्या कार्यालयात शक्ती प्रदर्शन ही केले. मात्र यावेळी इच्छुक उमेदवार बाळा भेगडे यांनी कार्यकर्त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपल्या पदरात उमेदवारी पाडून घेण्याचा प्रयत्न केलाय, असं काहीसं चित्र आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीमध्ये उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू असताना महाविकास आघाडीचे शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार संजोग वाघिरे यांचा प्रचार जोमात सुरू आहे. मावळ लोकसभेतील सहा विधानसभेत गाठीभेटी सुरू असून शिवसेना कार्यकर्त्यांची एक फळी निर्माण झाली आहे.

उबाठा गटाचे महिला मेळावे तसेच शिवसेना पदाधिकारी यांचे राजकीय डावपेच आखू लागलेत. त्यामुळे एकीकडे महायुतीचा तिढा वाढू लागलाय तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघिरे यांना मतांचा फायदा कसा होतो ते आणि विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांची यंदा हॅट्रिक होते का? तेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com