Fake Ten Rupee Coin News Saam tv
महाराष्ट्र

Fake Ten Rupee Coin News : १० रुपयांचे नाणे न स्वीकारल्यास कारवाई; जिल्हाधिकाऱ्यांनी दिला इशारा

Nanded News : मुंबई, पुणे सारख्या शहरात दहा रुपयांचे नाणे स्वीकारले जात असताना मराठवाड्यात मात्र दहा रुपयांचे नाणे कुणीही स्वीकारत नाही

Rajesh Sonwane

संजय सूर्यवंशी 

नांदेड : चलनात असलेले १० रुपयांचे नाणे बनावट असल्याची अफवा पसरली आहे. ही अफवा सर्वत्र (Nanded) पसरल्याने दुकानदार आणि नागरिक दहा रुपयांचे नाणे स्वीकारत नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. परंतु १० रुपयांचे नाणे न स्वीकारल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा जिल्हाधिकारी यांनी दिला आहे. (Tajya Batmya)

मुंबई, पुणे सारख्या शहरात दहा रुपयांचे नाणे स्वीकारले जात असताना मराठवाड्यात मात्र दहा रुपयांचे नाणे कुणीही स्वीकारत नाही. दहा रुपयांचे नाणे बनावट असून चायनाचे आहे; अश्या अनेक अफवा पसरल्या आहेत. त्यामुळे दहा रुपयांचे कॉइन कुणीच घेत नाहीत. विशेष म्हणजे अनेक बँकाही दहा रुपयांचे नाणे घेत नाहीत. याबाबतच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. जिल्हाधिकारी यांच्यापर्यंत पोहचल्या आहेत. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बँकांना पात्र पाठवत कारवाईचा इशारा 

१० रुपयांचे नाणे स्वीकारले जात नसल्याची बाब जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व बँकाना (Bank) एक पत्र पाठवले आहे. बँकांनी दहा रुपयांच्या नाणे स्विकारावे. दहा रुपयांच्या नाणे वैध असल्याबाबत बँकावर पोस्टर लावून फिरते ध्वनिक्षेपक लावून जनजागृती करावी; असे आदेश जिल्हाधिकार्यानी दिले. नाणे न स्वीकारल्यास कारवाईचा इशारा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिला आहे.

दुकानदाराने लावले पोस्टर 
एकीकडे दहा रुपयांचे नाणे स्वीकारले जात नसताना श्रीनगरमधील पंचशील ड्रेसेस या दुकान मालकाने चांगला पायंडा पाडलाय. दहा रुपयांचे नाणे स्वीकारले जातील असे पोस्टर्स त्यांनी दुकानात लाऊन ठेवले आहेत. ग्राहकाने कितीही नाणे दीले तरी ते स्वीकारत आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind Vs Eng सामना उशिराने सुरु, पावसामुळे भारताची विजयाची संधी हुकणार?

Bogus Soyabean Seeds : पेरलेले सोयाबीन उगवलेच नाही; शेतकऱ्यांकडून सोयाबीनची दुबार पेरणी

Unmarried Bollywood Actress: 'या' प्रसिद्ध अभिनेत्रींनी अजून केलं नाही लग्न

Mahayuti: नवी मुंबईत राजकीय घडामोडींना वेग; अजित पवार गट महायुतीतून बाहेर पडणार?

Mumbai Shocking : लव्ह, समलैंगिक संबंध अन् १६ वर्षीय मुलाचा संशयास्पद मृत्यू; मुंबईत अनोख्या प्रेमाचा धक्कादायक अंत

SCROLL FOR NEXT