Nanded News Saam tv
महाराष्ट्र

Nanded News : रस्ते जाम असल्याने एसटीच्या ८० फेऱ्या रद्द; इंधन साठा मुबलक असल्याचा दावा

Nanded News : ट्रक चालकांचा संप सुरु असल्याने इंधन पुरवठा करण्यावर प्रामुख्याने परिणाम झाला आहे. यामुळे पेट्रोल, डिझेलचा तुटवडा जाणवत असून पेट्रोल पंप देखील बंद पडले आहेत. या कारणाने बस फेऱ्यावर देखील याचा परिणाम झाल्याचे पाहण्याचे मिळत आहे

Rajesh Sonwane

संजय सूर्यवंशी

नांदेड : राज्यभरात ट्रक चालकांचा संप सुरु असल्याने याचा परिणाम सर्वत्र जाणवत आहे. ट्रक चालकांकडून (Nanded) आंदोलन करण्यात येत आहे. रस्ते अडविण्यात येत असल्याने वाहतूक खोळंबल्या आहेत. यामुळे नांदेड आगारातून जाणाऱ्या (St Bus) एसटीच्या ८० फेऱ्या रद्द करण्यात आलय आहेत. (Latest Marathi News)

ट्रक चालकांचा संप सुरु असल्याने इंधन पुरवठा करण्यावर प्रामुख्याने परिणाम झाला आहे. यामुळे (Petrol) पेट्रोल, डिझेलचा तुटवडा जाणवत असून पेट्रोल पंप देखील बंद पडले आहेत. या कारणाने बस फेऱ्यावर देखील याचा परिणाम झाल्याचे पाहण्याचे मिळत आहे. दरम्यान नांदेड- लातूर, नांदेड- हैदराबाद, नांदेड- नागपूर या मार्गावर धावणाऱ्या गाड्या रद्द करण्यात आल्या. या मार्गावर रास्ता रोको (Rasta Roko) आंदोलन होण्याची शक्यता असल्याचे बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या. पोलीस प्रशासनाच्या सुचनेनुसार बसफेऱ्या सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आगारात ४० हजार लिटर इंधन 

नांदेड आगारातून ८० बसफेऱ्या रद्द झाल्या आहेत. या फेऱ्या वाहतूक खोळंबल्यामुळे रद्द झाल्या असुन इंधन साठा मुबलक असुन काही ठिकाणी रास्ता रोको असल्याने बस फेऱ्या रद्द करण्यात आल्याची माहिती आगार व्यवस्थापकानी दिली. दरम्यान नांदेड आगारात ४० हजार लिटर इंधन असल्याचे सांगण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MLA Sadabhau Khot : 'माझ्या शरीरात शेवटचा रक्ताचा थेंब असेपर्यंत...' भरसभेत सदाभाऊ खोत ढसाढसा रडले; पाहा VIDEO

CancerAwareness : कर्करोग परत होण्याची शक्यता जास्त कधी असते? जाणून घ्या उपचार आणि बचावाचे मार्ग

Akola : पुरी- अहमदाबाद एक्सप्रेसमधून गांजाची तस्करी; अकोला रेल्वे स्थानकावर आरपीएफची कारवाई

Maharashtra Live News Update: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचा मुंबई दौरा

Manoj Jarange: बीडमधून जरांगेंची तोफ धडाडणार, आज निर्णायक सभा; नेमकं काय बोलणार?

SCROLL FOR NEXT