Manasvi Choudhary
नवरा- बायकोचं नातं म्हटलं की त्यात भांडणे आलीच मात्र कधी कधी या भांडणाचा शेवट टोकाचा देखील होतो.
नवरा बायकोच्या नात्यात सतत भांडणं होत असतील तर नेमके काय करावे हे आज जाणून घेऊया.
जेव्हा ती रागात असेल किंवा चिडचिड करत असेल, तेव्हा तुम्हीही त्याच भाषेत उत्तर देऊ नका. एकाने शांत राहिल्याने वाद वाढत नाही.
अनेकांना जुन्या विषयावर सतत चर्चा करून भांडणे करण्याची सवय असते मात्र असे करू नका यामुळे भांडणे वाढतात हे लक्षात घ्या.
समोरच्या व्यक्तीची चूक सांगताना ती शांततेत सांगण्याचा प्रयत्न करा. रागाने किंवा चिडून बोललल्याने भांडणे आणखी वाढतील
"माझी आई अशी करायची" किंवा "अमक्याची बायको बघ कशी आहे" अशी तुलना कधीच करू नका.
दिवसभरातून किमान १५-२० मिनिटे मोबाईल बाजूला ठेवून फक्त तिच्याशी गप्पा मारा. आठवड्यातून एकदा बाहेर फिरायला जा किंवा एखादा छोटा सरप्राईज प्लॅन करा.
अनेकदा स्त्रियांना फक्त त्यांचं कोणीतरी ऐकून घ्यावं असं वाटतं. तिला सल्ले देण्यापेक्षा तिचं मन मोकळं करू द्या. "तुझं बरोबर आहे" किंवा "मी समजू शकतो" हे शब्द जादू सारखं काम करतात.
तुमचे काही मतभेद असतील, तर ते चार भिंतींच्या आतच सोडवा. मित्र, नातेवाईक किंवा मुलांसमोर तिला बोलू नका.