School Bus Driver
School Bus DriverSaam tv

School Bus Driver: स्कूल बस चालकही होणार संपात सहभागी; 'हिट अँड रन' कायदा रद्द करण्याची मागणी

Latur News : ट्रक चालकांनी 'हिट अँड रन' या कायद्याच्या विरोधात दोन दिवसांपासून बंद पुकारला आहे. यामुळे जनजीवनावर याचा अप्रत्यक्षपणे परिणाम झाल्याचे पाहण्यास मिळत आहे
Published on

संदीप भोसले

लातूर : राज्यभरात ट्रक आणि टँकर चालकांनी संप पुकारला आहे. ट्रक चालकांच्या संपाला स्कुल बस (Latur) चालकांनी देखील पाठिंबा दर्शविला असून या संपात आता स्कूल बस (School Bus) चालक देखील सहभागी होणार आहेत. यामुळे शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची अडचण होणार आहे. (Live Marathi News)

School Bus Driver
Mumbai- Nashik Highway : वाहने आडवी लावत मुंबई- नाशिक महामार्ग रोखला; वाहन चालक आक्रमक

ट्रक चालकांनी 'हिट अँड रन' या कायद्याच्या विरोधात दोन दिवसांपासून बंद पुकारला आहे. यामुळे जनजीवनावर याचा अप्रत्यक्षपणे परिणाम झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. मुळात संपामुळे (Petrol) पेट्रोल, डिझेलचा पुरवठा होऊ शकत नसल्याने पंपावरील इंधन संपल्याचे अनेक ठिकाणी पाहण्यास मिळत आहे. लातूर जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपावर इंधनाचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

School Bus Driver
Nana Patole News : राज्यातील प्रश्नांवर लक्ष द्या, काँग्रेसवर नको; नाना पटोलेंचा विखे पाटलांवर निशाणा

स्कुल बस चालकांनीही केली मागणी 

दरम्यान 'हिट अँड रन' या कायद्याच्या विरोधात आता लातूरमधील स्कूल बस चालक देखील संपावर जाणार असल्याचे सांगितल जात आहे. त्यामुळे तात्काळ हा कायदा रद्द करावा आणि ट्रक, टँकर आणि स्कूल बस चालकांच्या प्रश्नांना न्याय द्यावा; अशी मागणी केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com