Latur Agriculture News
Latur Agriculture NewsSaam tv

Agriculture News : खरबूज पिक धोक्यात; सततच्या वातावरणीय बदलामुळे विविध रोगाचा प्रादुर्भाव

Latur News : लातूरच्या निलंगा तालुक्यातील सांगवी - जेवरी परिसरात असलेल्या अनेक शेतकरी संकटात सापडले आहेत. सतत होणाऱ्या हवामानातील बदलामुळे खरबुज पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव वाढला आहे
Published on

संदीप भोसले

निलंगा (लातूर) : गेल्या काही दिवसापासून लातूर जिल्ह्यात सतत होणाऱ्या वातावरणातील बदलामुळे निलंगा (Nilanga) तालुक्यातील खरबूज पिक धोक्यात आले आहे. या बदलत्या (Latur) वातावरणामुळे खरबूज पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव पडल्याचे पाहावयास मिळत आहे. (Maharashtra News)

Latur Agriculture News
Sai Mandir : साई मंदिर परिसरात 'नो मास्क..नो दर्शन'; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संस्थानने लावले फलक

लातूरच्या निलंगा तालुक्यातील सांगवी - जेवरी परिसरात असलेल्या अनेक शेतकरी (Farmer) संकटात सापडले आहेत. सतत होणाऱ्या हवामानातील बदलामुळे खरबुज पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव वाढला आहे. जिल्ह्यातील अनेक भागात खरबूज हे फळ पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र याच पीकावर आता पांढरी बुरशी आणि दावणी या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे खरबूज पीक वेल अवस्थेतच वाळून जात आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Latur Agriculture News
Anganwadi Worker : अंगणवाडी सेविकांचा थाळ्या वाजवत आंदोलन; मागण्या संदर्भात मोर्चा काढत केले आंदोलन

पंचनाम्याची मागणी 

अनेक महागड्या रासायनिक औषधाची  फवारणी करून देखील रोग आटोक्यात येत नाही. त्यामुळे आता शेतकरी हतबल झाले आहेत. वातावरण बदलामुळे होत असलेल्या नुकसानीचे प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून मदत द्यावी; अशी मागणी शेतकरी करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com