Nanded Tipper And Bike Accident Saam Tv
महाराष्ट्र

Nanded News: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक, २ तरुणांचा जागीच मृत्यू

Nanded Tipper And Bike Accident: नांदेडच्या बिलोली तालुक्यातील सगरोळी येथे ही घटना घडली आहे. रेतीची वाहतूक करणाऱ्या भरधाव टिप्परने दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणांना चिरडले. या अपघातामध्ये दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

Priya More

संजय सूर्यवंशी, नांदेड

नांदेडमध्ये भरधाव टिप्परच्या धडकेत (Nanded Accident) दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. रेती वाहतूक करणाऱ्या टिप्परने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये दोन तरुणांचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला आहे. नांदेडच्या सगरोळी येथे ही घटना घडली आहे. या अपघाताचा तपास नांदेड पोलिस (Nanded Police) करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बिलोली तालुक्यातील सगरोळी येथे ही घटना घडली आहे. रेतीची वाहतूक करणाऱ्या भरधाव टिप्परने दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणांना चिरडले. या अपघातामध्ये दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमी तरुणावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

सगरोळी येथील नवीन पवार, मोईन शेख हे तरुण दुचाकीवरून प्रवास करत होते. ते सगरोळीकडून गावातील बसस्थानकाकडे जात होते. त्याचवेळी रेतीघाटातून रेती वाहतूक करणाऱ्या भरधाव टिप्परने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या भीषण अपघातात नवीन पवार आणि मोईन शेख यांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे.

सध्या नांदेडच्या बिलोली तालुक्यात अवैध रेतीचा उपसा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. रात्रंदिवस रेतीची वाहतूक सुरू आहे. प्रशासन मात्र या अवैध रेती उपशाकडे दुर्लक्ष करीत आहे. या अवैध रेती वाहतूक करणाऱ्या टिप्परमुळे तरुणांचा बळी गेल्याचा आरोप करत स्थानिकांनी कारवाई करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, सोलापूर- पुणे महामार्गावर शनिवारी मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातामध्ये तिघांचा मृत्यू झाला होता. दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातामध्ये डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आटोपून घरी जाणाऱ्या दोन सख्ख्या जावा आणि एका तरुणाची मृत्यू झाला. टेंभुर्णी पोलिस या अपघात प्रकरणाचा तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devendra Fadnavis : 'महाराष्ट्रात अशी गुंडगिरी करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल'; मीरा रोडच्या घटनेवरुन CM देवेंद्र फडणवीस संतापले

Crime: 'महिलेला भूतबाधा झाली' सासरच्यांना बाहेर बसवलं, मांत्रिकांकडून गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार

CM Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; याचिकेतून विधानसभा निवडणुकीतील विजयाला दिलं होतं आव्हान

Maharashtra Live News Update: धाराशिवात १७ मुलींना झाली विषबाधा

The Hunt: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येवर आधारित 'द हंट' ही मालिका तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता?

SCROLL FOR NEXT