Dharashiv News: तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयात तुफान राडा; रुग्णाच्या नातेवाईकांनी तोडफोड करत आरोग्य कर्मचाऱ्याला केली मारहाण, नेमकं काय घडलं?

Vandalized Tuljapur Sub District Hospital: तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयाची तोडफोड केल्याचं समोर आलं आहे. या घटनेत रूग्णालयातील कर्मचारी जखमी झाले आहेत.
तुळजापूर उपजिल्हा रुग्णालय
Sub District HospitalSaam Tv

बालाजी सुरवसे, साम टीव्ही धाराशिव

धाराशिव जिल्ह्यामधून मोठी बातमी समोर येत आहे. एका रूग्णाच्या नातेवाईकांनी तुळजापूरमधील रूग्णालयात गोंधळ घातला आहे. त्यांनी तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयाची तोडफोड करत रूग्णालयातील कर्मचाऱ्यांना देखील मारहाण केली आहे. या घटनेमध्ये कर्मचारी जखमी झाल्याचं समोर आलं आहे. परंतु रूग्णाचे नातेवाईक आक्रमक का झाले? असा प्रश्न आता निर्माण होत आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयामध्ये (Tuljapur Sub District Hospital) ही घटना २५ मे रोजी साडेनऊ वाजता घडली आहे. आरोग्य कर्मचाऱ्याने रुग्णाच्या नातेवाईकांना 'रुग्णाचे नाव काय विचारले?' असं विचारलं. यावरून संतापलेल्या नातेवाईकांनी आरोग्य कर्मचाऱ्याला मारहाण केली. त्यांनी आक्रमक होत रूग्णालयाच्या काचा देखील फोडल्या आहेत.

अनंत गोरे, असं मारहाण केलेल्या आरोग्य कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्याने रूग्णाच्या नातेवाईकांना रुग्णाचं नाव विचारलं होतं. यावरून आक्रमक होत नातेवाईकांनी त्याला बेदम मारहाण करायला सुरुवात (Dharashiv News) केली. तसंच रुग्णालयाच्या काचा फोडल्या. रुग्णालयातील सामानाची तोडफोड करून नातलग पसार झाले आहेत. या संदर्भात तुळजापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेत अनंत गोरे गंभीर जखमी झाले (Tuljapur News) आहेत.

तुळजापूर उपजिल्हा रुग्णालय
Wife Beat Husband With Chappal: पत्नीकडून पतीची भररसत्यात धुलाई; गाल लाल होईपर्यंत चपलेने दिला चोप, VIDEO VIRAL

चार अज्ञात लोकं एका रूग्णाला घेऊन आले होते. त्यावेळी कर्मचाऱ्याने रूग्णाला नाव विचारलं. तेव्हा त्या लोकांनी हल्ला करत त्यास मारहाण करायला सुरूवात केली आहे. रूग्णाच्या डोक्याला मार लागलेला (Vandalized Tuljapur Sub District Hospital) आहे. पुढील उपचार करण्यासाठी रूग्णास धाराशिवला हलविण्यात आलं असल्याची माहिती, रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी आकृष बाराते यांनी दिली आहे.

मी अगोदर एका रूग्णाची ड्रेसिंग करत होतो. त्यावेळी हा रूग्ण आला. मी त्याच्या नातेवाईकांना तोपर्यंत केसपेपर करा, असं सांगितलं यावरून रूग्णाच्या नातेवाईकांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करायला सुरूवात केली, असं आरोग्य कर्मचारी अनंत गोरे यांनी सांगितलं आहे.

तुळजापूर उपजिल्हा रुग्णालय
Sangli Boy Beating By Mantrik: भूतबाधा काढण्यासाठी मांत्रिकाने केली अमानुषपणे मारहाण, मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com