Dhule News : धुळ्यात दोन दारू दुकान मालकांवर गुन्हा दाखल; अल्पवयीन मुलांना दारू विक्री

Dhule News : पुण्यात गेल्या काही दिवसांपूर्वी ड्रंक अँड ड्राईव्हच्या झालेल्या घटनेनंतर संपूर्ण राज्यामध्ये एकच खळबळ उडाली आणि या प्रकरणाची पोलीस प्रशासनाने गांभीर्याने दखल
Dhule News
Dhule NewsSaam tv
Published On

धुळे : पुणे ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणाची धुळ्यात देखील अल्पवयीन मुलांना दारू विक्री करणाऱ्या दुकान मालकांच्या विरोधामध्ये गांभीर्याने दखल घेण्यात आली आहे. त्यानुसार धुळे शहरामध्ये दोन वाईन शॉपवर पोलीस प्रशासनातर्फे कारवाई करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Dhule News
Sambhajinagar News : विद्यार्थ्यांना दिलासा; दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांचे २३.९ कोटीचे परीक्षा शुल्क माफ, खात्यात जमा होणार रक्कम

पुण्यात गेल्या काही दिवसांपूर्वी ड्रंक अँड ड्राईव्हच्या झालेल्या घटनेनंतर संपूर्ण राज्यामध्ये एकच खळबळ उडाली आणि या प्रकरणाची पोलीस प्रशासनाने गांभीर्याने दखल घेत आता (Dhule) धुळ्यात देखील १८ वर्षाखालील अल्पवयीन ग्राहकास दारू विक्री करणाऱ्या दारू दुकानांवर आता पोलीस प्रशासनाची करडी नजर असणार आहे. धुळे पोलीस (Dhule Police) प्रशासनातर्फे आता १८ वर्षाखालील अल्पवयीन मुलांना दारू विक्री करणाऱ्या वाईन शॉपवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.   

Dhule News
Akkalkuwa News : आदिवासी पाड्यावरील घराला आग; गायीचे वासरू, शेळ्यांचा होरपळून मृत्यू

धुळे शहरातील आझाद नगर पोलिसांनी (Police) व देवपूर पोलिसांनी दोन वाईन शॉप दुकानावर अचानकपणे धाड टाकून त्याठिकाणी अठरा वर्षांच्या खालील अल्पवयीन मुलांना दारू विक्री करणाऱ्या दुकान मालकांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्या विरोधामध्ये अल्पवयीन न्याय महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कायद्या अन्वये गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. तसेच या दोन्ही वाईन शॉपचे परवाने रद्द करण्याची मागणी देखील पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आली आहे. यामुळे आता दारू घेण्यासाठी आलेला ग्राहक हा अल्पवयीन तर नाही ना याची खातरजमा करूनच दारूची विक्री दुकान मालकाला करावी लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com