Sambhajinagar News : विद्यार्थ्यांना दिलासा; दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांचे २३.९ कोटीचे परीक्षा शुल्क माफ, खात्यात जमा होणार रक्कम

Sambhajinagar News : मराठवाड्यातील ७६ तालुक्यांपैकी ६८ तालुक्यामधल्या ३५४ महसूल मंडळात भीषण दुष्काळ पडलेला आहे. सरकारने हे तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केले होते
Sambhajinagar News
Sambhajinagar NewsSaam tv

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : राज्यात कमी पाऊस झाल्याने यंदा दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली अणे. मराठवाड्यात याची दाहकता अधिक असून शेतीतून काहीच उत्पन्न मिळाले नाही. यामुळे परीक्षा शुल्क भरणे देखील विद्यार्थ्यांना शक्य नव्हते. यामुळे सरकारने जाही केल्याप्रमाणे दुष्काळी भागातील ५ लाख ७ हजार ९६१ विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ करण्यात आले असून भरलेले शुल्क खात्यात जमा केले जाणार आहे. 

Sambhajinagar News
Akola News : कापूस बियाणे खरेदीसाठी पहाटेपासून शेतकरी रांगेत; पॅकेट कमी मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष

मराठवाड्यातील ७६ तालुक्यांपैकी ६८ तालुक्यामधल्या ३५४ महसूल मंडळात भीषण (Drought) दुष्काळ पडलेला आहे. सरकारने हे तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केले होते. दरम्यान दुष्काळामुळे काही पिकलेच नाही. त्यामुळे विद्यार्थी शालेय आणि महाविद्यालयीन शुल्क कसे भरू शकतील याचे भान ठेवून सरकारने दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांची (Student) शैक्षणिक परीक्षा शुल्क माफीचा निर्णय घेतलाय. त्यानुसार या मंडळाचा समावेश करून सेवा सवलती सुद्धा लागू केल्या आहेत. 

Sambhajinagar News
Farmer Rasta Roko : पाण्यासाठी शेतकरी उतरले रस्त्यावर; रस्ता रोको आंदोलनात पोलीस व शेतकऱ्यांमध्ये झटापट

शालेय, महाविद्यालयीन ५ लाख ७ हजार ९६१ विद्यार्थ्यांची जवळपास २३.९ कोटी रुपये परीक्षा शुल्क माफ करण्यात आले आहे. यामध्ये सर्वाधिक (Sambhajinagar) छत्रपती संभाजीनगरच्या १ लाख २३ हजार ७९९ विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मंजूर प्रतिपूर्तीची रक्कम शिक्षण मंडळ मार्फत विद्यार्थ्यांच्या खात्यावर वितरित होणार असल्याची माहिती विभागीय आयुक्तांनी मुख्यमंत्र्यांना आढावा बैठकीत दिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com