nanded shocking Saam tv
महाराष्ट्र

Shocking : जन्मदाता बाप बनला हत्यारा; सरपंचपदाचा हव्यास, पोटच्या मुलीची हत्या

nanded shocking : आता धक्कादायक बातमी आहे नांदेड जिल्ह्यातून...राजकारणचं भूत डोक्यात शिरलं अन जन्मदात्या पित्यानेच आपल्या पोटच्या मुलीची हत्या केली आहे. जिल्हा परीषद निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर मुखेड तालुक्यात समाजमन सुन्न करणारी घटना घडली आहे. पाहूया एक रिपोर्ट..

Girish Nikam

जिल्हा परीषद निवडणुकीची धामधूम सुरु असताना नांदेड जिल्ह्यात राज्याला हादरवणारी घटना घडली आहे. राजकीय स्वार्थासाठी जन्मदात्या पित्यानेच आपल्या पोटच्या मुलीची हत्या केलीय. निवडणुकीत तिसरे अपत्य अडथळा ठरू नये, यासाठी नराधम बाप क्रूर झाला. पांडुरंग कोंडामंगले असं आरोपीचं नाव आहे. मुखेड तालुक्यातील केरूर गावातील रहिवासी आहे. त्याला तीन वर्षांचा मुलगा आणि सहा वर्षांच्या जुळ्या मुली आहेत. सरपंच होण्याचं स्वप्न बाळगून तो निवडणुकीची तयारी करत होता. मात्र तीन अपत्यांचा नियम त्याची अडचण होती. मात्र सरपंच होण्याच्या हव्यासापायी बाप हैवान झाला. त्यानं स्वत:च्या मुलीलाच मारायचं ठरवलं.

कशी केली हत्या?

त्यासाठी त्यानं विद्यमान सरपंच गणेश शिंदे याची मदत घेतली. दोघांनी मिळून यासाठी वेगवेगळे मार्ग शोधले. सुरुवातीला एका मुलीला दत्तक देण्याचा किंवा दुसरीकडे सोडण्याचा विचार झाला. कागदोपत्री नाव कमी करण्यासाठी तो पुणे महापालिका कार्यालयातही जाऊन आला. मात्र, जन्म दाखल्यावर नोंद असल्याने कायदेशीररीत्या मुलं कमी करणे अशक्य असल्याचे त्याच्या लक्षात आले.

शेवटी एका मुलीची हत्या करण्याचे दोघांनी ठरवले. मुलगी प्राची हिला तेलंगणा राज्यातील कट्टापल्ली परिसरात तलावात फेकून दिलं. शेतातल्या मजुरांना मृतदेह दिसला. तपासानंतर तेलंगणा पोलिसांनी नराधम बापाला अटक केली असून निजामाबाद इथं दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झालाय.

तेलंगणा पोलिसांनी मुलीचा मृतदेह ताब्यात घेऊन तिचे फोटो सोशल मीडिया आणि वर्तमानपत्रात प्रसिद्ध केले. हे फोटो पाहून महाराष्ट्रातील एका व्यक्तीने मुलीची ओळख पटवली आणि पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलीस तातडीने नांदेडमधील केरूर गावात पोहोचले. पोलिसी खाक्या दाखवताच आरोपीने आपला गुन्हा कबूल केला.

निवडणूक लढवण्याचा नियम काय आहे?

महाराष्ट्र विधीमंडळाने 2005 मध्ये 'महाराष्ट्र नागरी स्थानिक संस्था आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम' मध्ये सुधारणा केली. यानुसार ज्या व्यक्तीला 12 सप्टेंबर 2001 नंतर दोनपेक्षा जास्त मुले आहेत, ती व्यक्ती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक लढवण्यास अपात्र ठरते. स्वतःचं मूल दुसऱ्याला दत्तक दिले, तरी कागदोपत्री त्या व्यक्तीच्या मुलांची संख्या कमी होत नाही. म्हणजेच, मूल दत्तक दिले तरी तो उमेदवार अपात्रच ठरतो.

राजकीय हव्यास आणि निवडणूक लढवण्याची नशा कोणत्या थराला जाऊ शकते, हे पाहून समाजमन सुन्न झालंय. राजकारणात जरुर यावे, निवडणूक लढवावी मात्र पदाचा टोकाचा हव्यास नको. मुखेड तालुक्यातील घटनेने राजकारणात माणूस कसा राक्षस होतो, याचं धक्कादायक उदाहरण समोर आलंय. राजकीय महत्वकांक्षा बाळगणारी काही माणसं स्वार्थासाठी रक्ताच्या नात्याचाही बळी देतात, असंच म्हणावं लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! मुंबई विमानतळावर Air India आणि इंडिगो विमानांच्या पंखांची टक्कर

मंत्री पंकजा मुंडेंच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड, नेमकं काय घडलं? VIDEO

मुंबई पोलिसांवर जीवघेणा हल्ला; तलवार, हॉकी, फायटर पंचने मारहाण, परिसरात खळबळ

Maharashtra Live News Update: अमरावतीच्या एमआयडीसी परिसरात फॅक्टरीला भीषण आग

Ajit Pawar Plane Crash: विमानातून उडी मारण्याची धरपड कुणीतरी करत होतं पण....; अपघाताप्रकरणी नवी माहिती आली समोर

SCROLL FOR NEXT