राज्यातील शिक्षकांची निवडणूक ड्युटी रद्द; जिल्हा परिषदांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोगाचा मोठा निर्णय

C-TET परीक्षा देणार्‍यांसाठी शिक्षकांना निवडणुकीच्या कर्तव्यातून सूट मिळालीये. राज्य निवडणूक आयोगाने याबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

सी-टीईटी परीक्षा देणाऱ्या शिक्षकांसाठी महत्वाची बातमी हाती आली आहे. सी-टीईटी परीक्षा देणाऱ्या शिक्षकांना जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या कर्तव्यातून सूट देण्यात आली. राज्य निवडणूक आयोगाने शिक्षकांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर जाहीर करण्यात आलेल्या तीन दिवसांच्या दुखवट्यामुळे निवडणुकांच्या मतदान तारखेत बदल करण्यात आला आहे. ५ फेब्रुवारी २०२६ ऐवजी आता ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान होणार आहे. त्याच दिवशी काही शिक्षकांची सी-टीईटी परीक्षा असल्याने त्यांना निवडणूक ड्युटीतून मुक्त करून पर्यायी व्यवस्था करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com