मनोज जरांगेंच्या घरी SIT पथक पोहोचलं; नेमकं प्रकरण काय?

SIT Officials Visit Manoj Jarange's Home: मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या ५०० कोटी रुपयांच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी एसआयटी पथक अंकुशनगर येथील त्यांच्या निवासस्थानी पोहोचले आहे. अधिकारी या प्रकरणाशी संबंधित ऑडिओ रेकॉर्डिंगची तपासणी करतील आणि पुरावे गोळा करतील अशी अपेक्षा आहे.
Manoj Jarange Sit Probe: Team Visits Home Over Rs 500 Crore Allegation
Manoj Jarange Sit Probe: Team Visits Home Over Rs 500 Crore Allegation
Published On: 

मनोज जरांगे पाटील यांच्या 500 कोटीच्या आरोपासंदर्भात एसआयटीचे अधिकारी मनोज जरांगे पाटील यांच्या घरी दाखल झाले आहे. एसआयटीचे अधिकारी जरांगे पाटील यांच्याकडील असलेली रेकॉर्डिंग ताब्यात घेणार आहेत. काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन ऑडिओ बॉम्ब टाकला होता. यानंतर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची एसआयटी चौकशी होणार असल्याचं जाहीर केलं होतं.

मनोज जरांगे पाटील यांनी टाकलेल्या ऑडिओ बॉम्ब संदर्भात चौकशी करण्यासाठी आणि पुरावे ताब्यात घेण्यासाठी एसआयटीचे अधिकारी मनोज जरांगे यांच्या राहत्या घरी अंकुशनगर येथे दाखल झाले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार पाचशे कोटी रुपयांच्या ऑडिओ क्लिप प्रकरणात एसआयटीचं पथक अंतरवाली सराटीमध्ये दाखल झाल्याने मनोज जरांगे पाटील हे आपला छत्रपती संभाजीनगर येथील दौरा आटपून तातडीने अतंरवाली सराटीकडे रवाना झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.