Police disperse an aggressive crowd during a violent anti-encroachment drive in Nanded. saam tv
महाराष्ट्र

नांदेडमध्ये अतिक्रमण कारवाईला हिंसक वळण; आधी जेसीबी चालकावर जमावाचा हल्ला नंतर पोलिसांचा लाठीमार|VIDEO

Nanded Encroachment Drive Turns Violent With Mob Attack: नांदेडमध्ये अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईदरम्यान परिस्थिती तणावपूर्ण बनली. जमावाने महापालिका पथकावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यानंतर पोलिसांनी लाठीमार करून गर्दी पांगवली.

Omkar Sonawane

संजय सूर्यवंशी, साम टीव्ही

नांदेड: शहरात सध्या महानगरपालिकेकडून अतिक्रमण काढण्याची विशेष मोहीम राबवली जात आहे. मात्र या मोहिमेला आता हिंसक वळण लागल्याचे पाहायला मिळत आहे. खडकापुर ते वाघी रॉड परिसरात अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या पथकावर आणि पोलिसांवर जमावाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. परिस्थिति हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी जमवावर लाठीमार करत त्यांना पांगवले. या घटनेमुळे संपूर्ण परिसारत सध्या तणावपूर्ण आहे.

नांदेड महानगरपालिकेचे पथक खडकापुर ते वाघी रोडवरील अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रम हटवण्यासाठी गेले होते. सोमवारी या मोहिमेदरम्यान काही जणांनी महापालिकेच्या कामात अडथळा आणला होता. इतकेच नाही तर संतप्त जमवातील काही तरुणांनी थेट जेसीबीवर चढून चालकाला बेदम मारहाण केली होती. त्यावेळी उपस्थित पोलिसांनी मध्यस्थी करत जेसीबी चालकाचा बचाव केला होता.

कालच्या प्रकरांनातर आज पुन्हा पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू करण्यात आली. यावेळी अतिक्रमण धारक आणि पोलिसांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली. अतिक्रमण धारकांनी कारवाईला कडाडून विरोध करत गर्दी जमवण्यास सुरुवात केली. जमाव आक्रमक झाल्याने आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने पोलिसांनी लाठीमार करून गर्दी पांगवली. खडकापुरा परिसरात सध्या मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिस्थिति नियंत्रणात असली तरी तणाव कायम आहे. दरम्यान सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या आणि जेसीबी चालकाला मारहाण करणाऱ्या समाजकंटाकावर काठोर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नसरापूर प्रकरणातील आरोपीचं वकिलपत्र घ्यायचं नाही, भोरमधील वकिलांच्या बार असोसिएशनचा निर्णय

SRPF Recruitment Exam: पोलिस भरतीत मोठा घोटाळा, परीक्षेमध्ये खासगी प्रकाशनाच्या पुस्तकातील ८५ प्रश्न जसेच्या तसे

Tamil Nadu Election 2026 : निकालानंतर थलपती विजय मोठा निर्णय घेणार; आमदारकीचा राजीनामा देणार, कारण काय?

Goa Travel Tips: गोव्याला फिरायला जाताय? मुलीनों, या 5 गोष्टी लक्षात ठेवा

Tharala Tar Mag: 'ठरलं तर मग'मध्ये मोठा ट्विस्ट! प्रॉपर्टी कागद लपवताना प्रिया कृष्णाच्या तावडीत सापडणार

SCROLL FOR NEXT