Nanded Crime News Saamtv
महाराष्ट्र

Nanded Crime News: खळबळजनक! पार्किंगच्या वादातून तरुणाचा हात छाटला; पोलिसांनी शहरातून धिंड काढत उतरवली मस्ती

Nanded Latest News: गुन्हेगारांमध्ये वचक रहावा या उद्देशाने तिन्ही आरोपींची शहरातून धिंड काढली.

Gangappa Pujari

संजय सुर्यवंशी, प्रतिनिधी...

Nanded Crime News: नांदेड शहरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शुल्लक कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणाचा हात छाटल्याची घटना उघडकीस आली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला अटक करत शहरातून धिंड काढली.. (Crime News In Marathi)

याबाबत अधिक माहिती अशी की, चार दिवसांपूर्वी नांदेड (Nanded Crime) शहरातील भाग्यनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पार्किंगवरुन दोन गटात वाद झाला. हा वाद वाढत जावून मारहाणीची घटना घडली होती.

यावेळी आरोपींनी त्रिशरण थोरात या तरुणाचा तलवारीने मनगटापासून हात छाटला होता. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी भाग्यनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत सुरज बसवते, आकाश रणमले, विजय जाधव या आरोपींना अटक केली.

दरम्यान, गुन्हेगारामध्ये वचक रहावी या उद्देशाने भाग्यनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सूर्यमोहन बोलमवाड यांनी आज तिन्ही आरोपिंची शहरातून धिंड काढली. भाग्यनगर पोलिस ठाणे ते जंगमवाडी आणि परत ठाण्यापर्यंत ही धिंड काढण्यात आली. पोलिसांच्या या धडक कारवाईचे नागरिकांमधून स्वागत होत आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑर्डर ऑफ द रिपब्लिकने सन्मानित

Badlapur Firing : बदलापूर गोळीबार प्रकरणाला नवं वळण; गाळीबारामागे शिवसेना पदाधिकाऱ्याचा हात?

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

DR. MC Dawar Death : आधी २ रुपये, आता २० रुपयांमध्ये करायचे उपचार; गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर काळाच्या पडद्याआड

Maharashtra Politics: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

SCROLL FOR NEXT