Ambadas Danave On Cm Eknath Shinde
Ambadas Danave On Cm Eknath ShindeSaam Tv

Ambadas Danave On Cm Eknath Shinde: 'ज्यांच्या मांडीला मांडी नको म्हणून बाहेर पडले, तेच मांडीवर येऊ बसले'; अंबादास दानवेंचा CM शिंदेंना टोला

Ajit Pawar Distributed Funds: अजित पवारांनी निधी वाटप केल्याची बातमी ट्वीट करत अंबादास दानवे यांनी शिंदे गटाला टोला लगावला आहे.
Published on

Maharashtra Politics: राष्ट्रवादीत (NCP) बंडखोरी करत शिंदे-फडणवीस सरकारला (Shinde-Fadnavis Government) पाठिंबा देणारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकताच अर्थखात्याचा पदभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी एका आठवड्याच्या आतच राष्ट्रवादीच्या बंडखोर आमदारांवर निधीवर्षाव केला आहे.

याच मुद्द्यावरुन आता शिवसेनेचे नेते आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danave) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Ekanath Shinde) यांच्यासह शिंदे गटावर निशाणा साधला आहे. त्यांनी अजित पवारांनी निधी वाटप केल्याची बातमी ट्वीट करत शिंदे गटाला टोला लगावला आहे.

Ambadas Danave On Cm Eknath Shinde
Funding For NCP MLA By Finance Minister: अजित पवार अ‍ॅक्शन मोडमध्ये, अर्थमंत्र्यांकडून राष्ट्रवादीच्या आमदारांवर निधीवर्षाव, किती निधी केला मंजूर?

अंबादास दानवे यांनी ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, 'ज्यांच्या मांडीला मांडी नको, म्हणून बाहेर पडलेल्या ४० मंडळींच्या मांडीवरच आता तेच ९ जण येऊन बसले. ते पण एकदम ठासून! हाच या कहाणीचा सध्याचा 'अर्थ' आहे.' अशा शब्दात त्यांनी शिंदे गटावर टीका केली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थखात्याची सूत्रे हाती घेताच आठवडाभरातच राष्ट्रवादीच्या आमदारांना निधी वाटप केला आहे. या आमदारांच्या मतदारसंघातील विकासकामांसाठी प्रत्येकी २५ कोटी किंवा त्याहून अधिक निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीसाठी पुरवणी मागण्यांमध्ये खास तरतूद करण्यात आली आहे.

विधिमंडळाला सादर करण्यात आलेल्या पुरवणी मागण्यांमध्ये लोकप्रतिनिधींच्या मतदारसंघांतील विकास कामांसाठी १५०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. नाराजी टाळण्यासाठी १५०० कोटींच्या तरतुदीतून राष्ट्रवादीबरोबरच शिंदे गटाच्या काही आमदारांच्या मतदारसंघांतील विकास कामांसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे.

यातूनच राष्ट्रवादीबरोबरच शिंदे गटाच्या आमदारांच्या मतदारसंघातील विकासकामांसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. अजित पवारांनी शिंदे गटाच्या काही आमदारांनाही निधी मंजूर करीत त्यांची नाराजी दूर करण्याचाही प्रयत्न केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com