Nanded: Son Kills Mother Before Ending His Life | Rahul Colony Incident Saam Tv
महाराष्ट्र

Shocking : नांदेड हादरलं! मुलाकडून जन्मदात्या आईची हत्या, नंतर स्वत:ही आयुष्य संपवलं

Nanded Crime News : नांदेडच्या राहुल कॉलनीत २६ वर्षीय मुलाने आईवर हल्ला केल्यानंतर आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. घटनेमागील कारणाचा पोलीस तपास सुरू आहे.

Alisha Khedekar

  • नांदेडच्या राहुल कॉलनीमध्ये धक्कादायक घटना

  • आईची हत्या करून मुलाने आयुष्य संपवलं

  • घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट

  • पोलीस तपास सुरु

नांदेडमध्ये धक्कादायक घटना घडली. जन्मदात्या आईची हत्या करून मुलाने आयुष्य संपवलं. सदर घटना शहरातील तरोडा नाका परिसरातील राहुल कॉलनी येथे काल रात्री घडली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, आईवर हल्ला करण्यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, राहुल कॉलनी परिसरात चौथरे कुटुंब वास्तव्यास आहे. या कटुंबातील २६ वर्षीय प्रतीक चौथरे याने रात्री सुमारे अकराच्या सुमारास आपल्या ५० वर्षीय आईवर घरातच हल्ला केला. या हल्ल्यात आई गंभीर जखमी झाली. त्यानंतर प्रतीक दुसऱ्या खोलीत गेला आणि तेथे त्याने आत्महत्या केली.

घरातून संशयास्पद आवाज येत असल्याने शेजाऱ्यांना काहीतरी अनुचित घडल्याचा संशय आला. त्यांनी घराची पाहणी करण्याचा प्रयत्न केला असता घटना समोर आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली. प्रतीकचे वडील नोकरीच्या निमित्ताने बाहेरगावी असतात. ते घरी नसताना ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.

आईवर हल्ला करून त्यानंतर प्रतीकने आत्महत्येचे पाऊल का उचलले, यामागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. या प्रकरणाचा पोलिसांकडून विविध बाजूंनी तपास सुरू असून, घटनास्थळावरील परिस्थिती तसेच उपलब्ध पुराव्यांच्या आधारे घटनेमागील कारण शोधण्याचे काम सुरू आहे. पोलिसांच्या तपासानंतरच या दुर्दैवी घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बारामती मध्ये पुन्हा एकदा विमान दुर्घटना

Baramati Plane Crash: बारामतीमध्ये पुन्हा विमान कोसळलं, थरारक VIDEO समोर

Weight Loss: रोज व्यायाम आणि डाएट करूनही वजन वाढतंय? मग 'या' 7 कारणांमुळे होत नसेल वजन कमी

Parenting Tips : पालकांसाठी धोक्याची घंटा! मुलाला उशिरा झोपवताय? शरीरात होतात 'हे' ५ गंभीर बदल

Bollywood actor Affair : बॉलिवूडच्या 'ग्रीन फ्लॅग' अभिनेत्याचं अर्ध्या वयाच्या अभिनेत्रीसोबत अफेअर; पत्नीने केली पोलखोल

SCROLL FOR NEXT