Congress MP Vasant Chavan Passes Away:  Saamtv
महाराष्ट्र

Vasant Chavan Passes Away: 'एकनिष्ठ, लढवय्या शिलेदार हरपला', वसंत चव्हाण यांच्या निधनाने शरद पवार, अशोक चव्हाण हळहळले!

Gangappa Pujari

नांदेड, ता. २६ ऑगस्ट २०२४

नांदेडचे विद्यमान खासदार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंत चव्हाण यांचे आज दुःखद निधन झाले. मध्यरात्री प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने महैद्राबादमधील किम्स रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. पहाटे उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या ६४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काँग्रेसचे निष्ठावान अशी ओळख असलेल्या वसंत चव्हाण यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह अनेकांनी चव्हाण यांच्या निधनावरुन शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे.

विनम्र, अनुभवी नेतृत्व गेले: शरद पवार

नांदेडच्या जनतेशी थेट संपर्क ठेवणारे विनम्र आणि अनुभवी नेतृत्व आज हरपले. काँग्रेस पक्षाचे विद्यमान खासदार वसंत चव्हाण यांची दीर्घ आजाराने प्राणज्योत मालवली. राजकारण आणि सहकार क्षेत्रात त्यांचे काम लक्ष वेधणारे आहे. जनकल्याणासाठी त्यांनी केलेला राजकीय प्रवास हा लक्षणीय आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी त्यांचे असलेले जुने संबंध सदैव स्मरणात राहतील. त्यांच्या कुटुंबीयांप्रती सहावेदना व्यक्त करून वसंत चव्हाण यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हळहळले

"काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार वसंतरावजी चव्हाण यांच्या निधनाची वार्ता अत्यंत धक्कादायक आहे. प्रतिकूल परस्थितीत देखील त्यांनी काँग्रेस पक्षाशी सदैव एकनिष्ठ राहून काँग्रेस पक्षाचा विचार घरोघरी पोहोचवला. वसंतरावजी चव्हाण साहेबांना जड अंतःकरणाने श्रद्धांजली अर्पण करतो. चव्हाण कुटुंबियांवर कोसळलेल्या या दुःखात संपूर्ण काँग्रेस पक्ष त्यांच्यासोबत आहे," असे म्हणत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

लढवय्या नेता हरपला : बाळासाहेब थोरात

"काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, नांदेड लोकसभेचे खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दु:खद आहे. काँग्रेस पक्षाने एक लढवय्या नेता आणि आपण एक सहकारी गमावला आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहून त्यांनी नांदेड जिल्ह्यात काँग्रेस विचार टिकवून ठेवला. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. आम्ही सर्वजण चव्हाण कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहोत.

काँग्रेसच्या विचारांचा सच्चा पाईक हरपला: विजय वडेट्टीवार

नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार वसंतरावजी चव्हाण यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. काँग्रेस विचारांशी एकनिष्ठ राहून त्यांनी कठीण काळात काँग्रेस पक्षाला साथ दिली आणि नांदेड जिल्ह्यात पक्ष संघटना टिकवून ठेवली होती. काँग्रेस पक्ष हेच आपले कुटुंब आहे या भावनेने ते आयुष्यभर काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिले. काँग्रेस विचारांचा सच्चा पाईक असणाऱ्या वसंतरावजी चव्हाण यांच्या निधनाने पक्षाची मोठी हानी झाली आहे. वसंतरावजी चव्हाण यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या कठीण प्रसंगी चव्हाण कुटुंबाच्या आणि मित्र परिवाराच्या दुःखात सहभागी आहोत, असे म्हणत विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

भाजप नेते अशोक चव्हाणही गहिवरले!

"अतिशय दुखद घटना आहे. मध्यंतरी त्यांना त्रास झाला त्यानंतर त्यांना हैदराबाद येथे हालवण्यात आले. असं वाटत होतं की ते बरे होतील पण हा धक्कादायक असा प्रसंग आहे. काँग्रेसमध्ये असताना आम्ही एकत्र काम केले आहे. जिल्ह्याच्या राजकारणात आम्ही एकत्रपण होतो. त्यांचा प्रवास मी जवळून पाहिला आहे. अनेक वेळा कठीण प्रसंगात देखील त्यांची साथ आम्हाला वेळोवेळा मिळत आली आहे. त्यांच्या जाण्याने मला तीव्र दुखः झाले आहे," असे भारतीय जनता पक्षाचे नेते अशोक चव्हाण म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT