Nanded Accident News  Saam Tv
महाराष्ट्र

Nanded Accident News: नांदेडमध्ये भीषण अपघात; दुचाकी दीड किलोमीटर फरफटत नेली, एकाचा मृत्यू, अपघातानंतर ट्रक पेटली

Truck Heat Bike: नांदेडमध्ये ट्रक आणि मोटारसायकलच्या धडकेत एकाचा मृत्यू झाला आहे. तर या अपघातात ट्रक पूर्णपणे जळाल्याचं समोर आलं आहे.

Rohini Gudaghe

संजय सूर्यवंशी, साम टीव्ही नांदेड

नांदेड ते किनवट जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील सावरी घाटामध्ये मोटार सायकल आणि ट्रकचा विचित्र अपघात झाला आहे. ट्रक चालकाने मोटार सायकल चालकाला एक ते दिड किलोमीटर फरफटत नेलं. त्यामुळे एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडला आहे.

मोटारसायकल फरफट नेल्यामुळे या अपघातात ट्रकने पेट घेतला (Nanded Accident News) होता. नांदेडच्या इस्लापूर ते किनवट राष्ट्रीय या महामार्गावरील बोधडीपासून जवळ असलेल्या धानोरा सावरी घाटात ही घटना घडली आहे. मोटार सायकल आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली. मोटरसायकल ट्रकमध्ये अडकली. त्यामुळे फरफटत गेली. त्यामुळे ट्रक पेटल्याचं समोर आलं आहे.

या आगीच्या भडक्यात ट्रकने चांगलाच पेट घेतला (Accident News) आहे. अशा या विचित्र अपघातात एकाचा मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. त्याला प्रथम उपचारासाठी किनवट येथे उपचारासाठी हलवण्यात आलं आहे. ट्रक चालक अपघातानंतर पळून गेल्याचं पाहायला मिळालं आहे. मात्र. या विचित्र अपघातात मरण पावलेल्या आणि गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही. ट्रकने मात्र चांगलाच भडका घेतल्याचं (Road Accident) दिसून येत आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये मद्यपी कारचालक तरुणाने धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळालं आहे. त्याने भरधाव वेगात गाडी चालवत चार दुचाकींचा पार चुराडा केला आहे. या अपघातामध्ये कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान (Truck Heat Bike) झालं आहे. तर नागपूरमध्ये कार आणि ऑटोच्या अपघातामध्ये अकरा लोकं जखमी झाले आहेत. जखमींवर उपचार सुरू असल्याची माहिती मिळतेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT