Nanded : खड्ड्यांमुळे महिलेची झाली रस्त्यातवरच प्रसुती! संतोष जोशी
महाराष्ट्र

Nanded : खड्ड्यांमुळे महिलेची झाली रस्त्यातच प्रसुती!

नांदेड जिल्ह्यात रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. पावसामुळे या रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडलेत.

संतोष जोशी साम टीव्ही न्यूज नांदेड

नांदेड : नांदेड जिल्ह्यात रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. पावसामुळे या रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडलेत. अशाच खड्डेमय रस्त्यावरुन प्रसुतीसाठी उप-केंद्राकडे जाताना आज महिलेची प्रसुती रस्त्यातच प्रसूती झाली आहे. या महिलेची स्थानिक महिलांनी प्रसुती केली. या महिलेच्या पोटी कन्या रत्न जन्मास आले आहे. कंधार तालुक्यातील फुलवळ येथील ही घटना आहे.

हे देखील पहा :

आज सकाळी कंधारेवाडी येथील आशा श्रीमंगले या गर्भवती महिलेच्या प्रसव कळा वाढल्याने तीला ऑटोतून फुलवळ येथील आरोग्य उपकेंद्रात नेण्यात येत होते. मात्र, रस्त्यावरील खड्ड्यांमुळे सदर महिलेला प्रसव कळा असह्य झाल्या आणि रस्त्यावरच स्थानिक महिलांच्या मदतीने तीची प्रसुती झाली.

दैव बलवत्तर म्हणून प्रसुती चांगली झाली आणि तीने कन्या रत्नाला जन्म दिला. प्रसुती ची माहिती मिळताच आरोग्य सेविका प्रसुती च्या ठिकाणी आली आणि तीने बाळ आणि आईची प्रकृती चांगली असल्याचे सांगितले. नांदेड जिल्ह्यातील अनेक भागात रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे गर्भपाताच्या घटना, अनेक दुर्घटना घडल्या आहेत. जिल्हयातील खड्डेमय रस्ते कधी सुधारणा असा प्रश्न संतप्त नागरिकांतून व्यक्त केला जात आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Marathi bhasha vijay live updates : विजयी मेळावा, राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकाच मंचावर, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना कर्ज नाही; अजित पवारांचं आश्वासन हवेत विरलं, कारण काय?

Saturday Horoscope : मोठी स्वप्न पूर्ण होतील, दिवस चांगला जाणार; ५ राशींच्या लोकांचं नशीब उजळणार

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

SCROLL FOR NEXT