छोटा राजन अन् शिवसेना आमदार सुहास कांदेंविषयी काय म्हणाले भुजबळ?

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री यांनी आज नाशिक मधील पूरपरिस्थिती व नुकसानीचा पाहणी दौरा केला. यावेळी नाशिक शहरातील अहिल्याबाई होळकर पुलावरून त्यांनी पुराची पाहणी केली.
छोटा राजन अन् शिवसेना आमदार सुहास कांदेंविषयी काय म्हणाले भुजबळ?
छोटा राजन अन् शिवसेना आमदार सुहास कांदेंविषयी काय म्हणाले भुजबळ?सागर गायकवाड
Published On

~ सागर गायकवाड

नाशिक : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री यांनी आज नाशिक मधील पूरपरिस्थिती व नुकसानीचा पाहणी दौरा केला. यावेळी नाशिक शहरातील अहिल्याबाई होळकर पुलावरून त्यांनी पुराची पाहणी केली. अतिवृष्टीमुळे गोदावरी नदीचे पात्र जलमय झाले असून शहरातील अनेक पुरातन मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. यावेळी आपत्कालीन यंत्रणांचा भुजबळांनी आढावा घेतला आहे.

यावेळी बोलताना भुजबळ म्हणाले, जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान आले आहे. मात्र, सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवित हानी झाल्याचे अद्याप तरी कळालेले नाही. ४ ते ५ जनावरे मृत्युमुखी पडल्याचे समजते. जिथे-जिथे नुकसान झाले आहे, तेथील परिस्थितीचा आढावा घेऊन तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. पाऊस आणि रस्त्यांची झालेली दुरावस्था यामुळे यंत्रणांना मदत पोहचवण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील नुकसानीबाबत लवकरच आढावा बैठक घेणार आहे.

हे देखील पहा :

शिवसेना आमदार सुहास कांदे आणि छोटा राजनविषयी प्रतिक्रिया :

नांदगावचे शिवसेना आमदार सुहास कांदे Suhas Kande आणि पालकमंत्री छगन भुजबळ chhagan Bhujbal यांच्यामध्ये, काही दिवसांपूर्वी एका बैठकीत जोरादार शाब्दिक चकमक झाली होती. भुजबळ-कांदे वाद इतका उफाळला होता कि, कांदे यांनी भुजबळांनी जिल्हा नियोजन समितीच्या निधीत गैरव्यवहार केल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी आमदार कांदे यांनी छगन भुजबळ यांच्या विरोधात हायकोर्टात धाव घेतली होती. भुजबळांविरोधात दाखल केलेली केस मागे घेण्यासाठी चक्क छोटा राजनचा पुतण्या अक्षय निकाळजे याने फोन करून धमकवल्याची तक्रार कांदे यांनी केली होती.

छोटा राजन अन् शिवसेना आमदार सुहास कांदेंविषयी काय म्हणाले भुजबळ?
Breaking : ओला दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय लांबणीवर!

दरम्यान, पत्रकारांनी या प्रकरणाविषयी विचारले असता भुजबळ यांनी कांदे हेच नेते असून मी नेता नाही असा टोला लगावला आहे. माझा काही संबंध नसताना छोटा राजन टोळी सोबत नाव जोडण्याचे कारस्थान करण्यात येत आहे. मी गेली ४० वर्षे राजकारणात काम करत असून, असे खोटेनाटे आरोप करून, आणि एखाद्या प्रकरणावरून प्रतिमा मलीन करण्याचे काम कांदे करत असल्याचे भुजबळ म्हणाले. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. प्राथमिक चौकशीत सुहास कांदे यांनी चालवायला घेतलेल्या टोलनाक्यावर झालेल्या मारहाण प्रकरणी त्यांना धमकी देण्यात आली असल्याचे उघड झाले आहे.

टोल नाक्यावर कांदे यांच्या लोकांनी ज्या इसमाला मारहाण केली आहे, त्यांच्या सांगण्यावरून त्यांना धमकी देण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळाल्याचे भुजबळ म्हणाले. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मी स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी केली आहे. नाव बदनाम करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई व्हायला पाहिजे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com