Breaking : ओला दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय लांबणीवर!

गुलाब चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर अंदाजे 8 हजार कोटी रुपयांच्या नुकसानीचा आकडा येत आहे. महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे या संकटाने प्रभावित झाले आहेत, याची माहिती घेऊन पुढच्या मंत्रिमंडळ बैठकीत ओला दुष्काळ निश्चित करायचा का? यावर निर्णय घेण्यात येईल असे वडेट्टीवार म्हणाले.
Breaking : ओला दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय लांबणीवर!
Breaking : ओला दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय लांबणीवर!Saam Tv
Published On

~ रामनाथ दवणे / रश्मी पुराणिक

मुंबई : अतिवृष्टी, पूरपरिस्थिती आणि गुलाब चक्रीवादळामुळे राज्यभरात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, शेतकऱ्यांकडून तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून मदतीची मागणी करण्यात येत आहे. आज राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मुंबई मध्ये पत्रकार परिषद घेऊन राज्यातील परिस्थितीचा आढावा मांडला आहे.

यावेळी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, गुलाब चक्रीवादळ आल्याने राज्यात अनेक भागात पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक धरणे ओव्हरफ्लो झाल्याने शेतीसह इतर मालमत्तांचे प्रचंड नुकसान झाले आहे. राज्यातील अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. राज्यभरात 100 ते 150 मिमि पावसाची नोंद झाली आहे. या सप्टेंबर महिन्यात 71 जणांचा मृत्यू तर 97 जनावरांचा, विजेचा धक्का लागून मृत्यू झाला आहे. 21 जिल्ह्यात 17 लाख हेक्टर जमिनीचे नुकसान झाले असून, 81% नुकसान पंचनामे झाले आहेत. गुलाब चक्रीवादळातील नुकसान पकडता 22 लाख हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे.

हे देखील पहा :

अतिवृष्टीने आणि पूरपरिस्थितीमुळे राज्यभरात रस्त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. खरडुन गेलेल्या जमिनीचे पंचनामे करायला सांगितले असून. या पावसात शेती पंप आणि पाईप पाण्यात वाहून गेले आहेत. केंद्र सरकारकडे यासंदर्भात मदतीचा प्रस्ताव पाठविण्यात आला, मात्र मोजकीच मदत केंद्राकडून देण्यात आल्याचे वडेट्टीवारांनी सांगितले.

तौक्ते चक्रीवादळाची मदत म्हणून 230 कोटी 34 लाख रुपयांची मदत केंद्र सरकारकडे राज्य सरकारने मागितली होती. मात्र, केंद्राकडून अद्यापही मदत मिळालेली नाही. राज्यात 2 वर्षात विविध वादळामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. सर्व नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश संबंधित जिल्हाधिकारी यांना दिले आहेत. संपूर्ण पंचनामे झाल्यानंतर मदतीचे प्रस्ताव पाठविण्यास जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले असून केंद्राकडे अनेक वेळा मदत मागितली पण मदत मिळत नसल्याची खंत वडेट्टीवारांनी व्यक्त केली आहे.

पुढे बोलताना वडेट्टीवार म्हणाले, डिसेंबर २०१९ मध्ये ९३ कोटी रुपयांच्या मदतीची केंद्राकडे करण्यात आली होती. पण, ती मदत अजूनही मिळाली नाही. निसर्ग चक्रीवादळात झालेल्या नुकसानीसाठी १०६५ कोटी रुपयांची मागणी राज्य सरकारने केली होती. मात्र, केंद्राकडून फक्त २६८ कोटी रूपये देण्यात आले होते. जून-ऑक्टोबर २०२० मध्ये ३७२१ कोटीचा प्रस्ताव राज्याने केंद्राकडे पाठवला होता. याहीवेळी केंद्राने केवळ ७०१ कोटी दिले.

Breaking : ओला दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय लांबणीवर!
Solapur : पतीच्या निधनाचे दुःख असह्य झाल्याने पत्नीची आत्महत्या!

तौक्ते चक्रीवादळ आपत्तीमध्ये २०३ कोटीचा प्रस्ताव होता, तो अद्याप मंजूर झाला नाही. जुलै २०२१ मध्ये १६५९ कोटींची मागणी केली. असे वारंवार केंद्र सरकार, महाराष्ट्राला मदत देताना हात आखडतेपणा करत असल्याची टीका देखील वडेट्टीवारांनी केली. आपत्तीमध्ये केंद्राची पथके येत नाहीत. मागीलवर्षी राज्य सरकारने 10 हजार कोटींचे पॅकेज आपत्तीच्या वेळी जाहीर केले होते. यावर मला राजकीय भाष्य करायचे नाही. परंतु, राज्याबरोबरच केंद्र सरकारने सुद्धा शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचेअसल्याचे ते म्हणाले.

गुलाब चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर अंदाजे 8 हजार कोटी रुपयांच्या नुकसानीचा आकडा येत आहे. महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे या संकटाने प्रभावित झाले आहेत, याची माहिती घेऊन पुढच्या मंत्रिमंडळ बैठकीत ओला दुष्काळ निश्चित करायचा का? यावर निर्णय घेण्यात येईल असे वडेट्टीवार म्हणाले. SDRF च्या निकषाप्रमाणे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना 4 लाख तातडीने देण्याच्या सूचना करण्यात आल्या असून. ज्या-त्या जिल्ह्याचे पालकमंत्री आपल्या जिल्ह्यांचा दौरा करत आहेत. मी, काल औरंगाबाद मध्ये होतो. माझ्या जिल्ह्यात फारसं नुकसान झालेले नाही. मराठवाडा, विदर्भाकडे कोणी दुर्लक्ष करतंय, असे मला वाटत नाही. मुसळधार पावसामुळे रस्त्याने व हेलिकॉप्टर मधून देखील सदर परिसरात जाता येत नसून, मुख्यमंत्री यांच्याशी माझी चर्चा झाली असून, मुख्यमंत्री मराठवाड्याच्या दौऱ्यावर जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

राज्यातील नैसर्गिक संकटे; राज्याने मागितलेली मदत आणि केंद्रांने दिलेली मदत :

राज्यात 2019 आणि जानेवारी 2020 मध्ये झालेला अवेळी पाऊस आणि गारपीटसाठी राज्य सरकारने केंद्राकडे 93.58 कोटींची मदत मागितली. मात्र, केंद्रीय पथक पाहणी करायला आले नाही.NDRF मधून मदत नाकारली.!

निसर्ग चक्रीवादळ जून 2020 :

राज्य सरकारने 1065.58 कोटींची मदत केंद्राकडे मगितली, केंद्राने फक्त 268.59 कोटी मदत दिली.

पूर्व विदर्भातील पूर परिस्थिती : 999.64 कोटी ची मागणी, केंद्राने दिले 151.53 कोटी

जून-ऑक्टोबर 2020 मधील अतिवृष्टी आणि पूर; राज्याने 3821.29 कोटींची मागणी केली, केंद्राने दिले 701 कोटी.

तौक्ते चक्रीवादळ 2021 -

राज्याने 203.34 कोटी मागणी केली, अजून केंद्राने निधी दिला नाही.

जुलै 2021 राज्याने 1659.51 कोटींची मदत मागितली, केंद्राने अजून मदत दिली नाही !

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com