Nana Patole, Nitin Gadkari, Narendra Modi, Wardha News  saam tv
महाराष्ट्र

Congress Samvad Yatra 2023 : पंतप्रधानपदावरून गडकरी मोदींचे भांडण सुरू : नाना पटाेले

Nana Patole News : डिसेंबरमध्ये सर्व्हे होईल तेव्हा भाजपा पुन्हा खाली येईल असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला.

Siddharth Latkar

- चेतन व्यास

Wardha News : भाजपने जाे सर्व्हे केला त्यात ५० खासदार त्यांना कमी पडताहेत म्हणून गडकरी आता थोडे उभे झाले. गडकरी आणि मोदींचे भांडण सुरु झालंय ना अशी टिप्पणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वर्धा येथे केली. (Maharashtra News)

काँग्रेसने सुरु केलेली जनसंवाद यात्रा वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे पहिल्या दिवशी पाेहचली. तेथे सभा झाली. यावेळी नाना पटोले, सुनील केदार, अमर काळे यांची उपस्थिती होती. या सभेत नाना पटोले यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधला. पुढील निवडणुकीत ईव्हीएम मशिन वगैरे काही चालणार नाही असे पटाेलेंनी म्हटले.

पटाेले म्हणाले काँग्रेस मतविभाजनामुळे पडली पण पुढील निवडणुकीत मतविभाजन होणार नाही. मतविभाजन होऊ नये यासाठी पूर्ण प्लॅनिंग केल्याचे पटाेलेंनी नमूद केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान वाचविणे, तरुणांना, शेतकऱ्यांना न्याय देण्याचा संकल्प काँग्रेसचा आहे.

चुकून पुढील निवडणुकीत मतविभाजन झालं तर आपल्याला माफ करायला कोणीच राहणार नाही. ज्यांनी मतविभाजनाची दुकान लावली होती त्या आता थंड पडल्या आहे. नागरिकांना आता कळतंय अशी टीका नाना पटोले यांनी केली.

दरम्यान भाजपने जाे सर्व्हे केला त्यात ५० खासदार त्यांना कमी पडताहेत असे सांगत पटाेले म्हणाले पुर्वी नितीन गडकरी हे दबले होते तर आता ते उठले आहेत. कारण ५० खासदार कमी पडले तर मी प्रधानमंत्री बनेल, असं सुरू झालंय. त्यांचा (माेदी-गडकरी) वाद सुरू झालाय. डिसेंबरमध्ये सर्व्हे होईल तेव्हा भाजपा पुन्हा खाली येईल असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagpur : नागपुरात पेट्रोल पंपावर दिसला वाघ; परिसरात भीतीचे वातावरण, व्हिडिओ व्हायरल

Ajit Pawar Plane Crash Mystery: दादांच्या अपघातावरून पुन्हा 'संशयकल्लोळ', अपघातापूर्वी बारामती विमानातळाची रेकी

एकनाथ शिंदे मोठा डाव टाकणार; कोणाच्या गळ्यात घालणार राज्यसभेची माळ? शेवटच्या क्षणापर्यंत संस्पेन्स

T20 WC 2026: टॉपर दक्षिण आफ्रिका पुन्हा 'चोकर्स'; न्यूझीलंडने दिमाखात गाठली फायनल, पाच पराभवांचा घेतला बदला

युद्धाचा भडका, शेतकऱ्यांना फटका; आखाती देशांमध्ये निर्यात महागली, VIDEO

SCROLL FOR NEXT