Adulteration In Milk : नंदूरबारकरांना मिळतंय भेसळयुक्त दूध, 9 विक्रेत्यांवर कारवाई; 334 लिटर दूध नष्ट

दुग्धविकास अधिकारी डॉ. अमित पाटील यांनी साम टीव्हीला दिली माहिती.
Nandurbar News, Adulteration in milk
Nandurbar News, Adulteration in milksaam tv
Published On

- सागर निकवाडे

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यासह शहरात भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्या विक्रेत्यांच्या विरोधात विशेष मोहीम उघडण्यात आली आहे. दूध भेसळ विरोधी पथकाने नंदुरबार शहरात 18 ठिकाणी तपासणी केली. यामध्ये नऊ विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे. या पथकाने भेसळयुक्त 334 लिटर दूध नष्ट केले आहे. (Maharashtra News)

Nandurbar News, Adulteration in milk
Shravan Maas 2023: श्रावणात केळीचा दर भडकणार? शेतकरी सुखावला, कृषी उत्पन्न बाजार समितीत मिळाला उच्चांकी भाव

नंदुरबार जिल्ह्यात आणि शहरात भेसळयुक्त दुधाची विक्री होत असल्याच्या तक्रारी वाढल्या हाेत्या. या वाढत्या तक्रारींची दखल घेत जिल्हा दुग्ध विकास आणि व्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांनी सकाळपासूनच नंदुरबार शहरातील विविध दूध विक्रेत्यांची तपासणी सुरू केली.

या पथकाने 18 ठिकाणी तपासणी केल्यानंतर नऊ दूध विक्रेत्यांकडे दुधामध्ये पाण्याचे प्रमाण अधिक आढळून आल्याने 334 लिटर दूध नष्ट करण्यात आले आहे. काही ठिकाणी दुधाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

Nandurbar News, Adulteration in milk
Tomato Price Drop In Nashik : बाजार समितीत टाेमॅटाेचा दर काेसळू लागला, जाणून घ्या महत्त्वाचे कारण

नंदूरबार जिल्ह्यात ही मोहीम सुरूच राहणार असून दुधात भेसळ करणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई करून फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. ज्या ठिकाणी तपासणी करत असताना दुधात पाण्याचे प्रमाण जास्त दिसून आले ते दूध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी लगेच जागेवर नष्ट केले आहे.

दुसरीकडे मोठ्या प्रमाणात कारवाई होत असल्याने ग्रामीण भागातील काही दूध विक्रेत्यांनी शहरात न येणेच पसंत केले आहे. एकूणच जिल्ह्यात भेसळयुक्त दुधाच्या विरोधात कारवाई सुरू झाल्याने भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्या विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. ही मोहीम जिल्हाभरात असे सुरू राहणार असल्याची माहिती दुग्धविकास अधिकारी डॉ. अमित पाटील यांनी दिली आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com