Maratha Andolan : सकल मराठा समाजाची उद्या काेल्हापूर, माळशिरस बंदची हाक

Maratha Reservation Protest : राज्यातील बहुतांश जिल्ह्यात आज सकल मराठा समाज आरक्षणाच्या मुद्यावर आंदाेलन करीत आहे.
Maratha Kranti Morcha,Kolhapur, Malshiras
Maratha Kranti Morcha,Kolhapur, Malshiras saam tv
Published On

- रणजीत माजगावकर / भारत नागणे

Maratha Kranti Morcha Latest Updates :

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी (antarwali sarathi latest updates) येथे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी (Maratha Aarakshan) उपोषणास बसलेल्या आंदाेलकांवर केलेल्या लाठीहल्लाचा निषेध नाेंदविण्यासाठी सकल मराठा समाजाने उद्या (मंगळवार) काेल्हापूर (kolhapur band) आणि माळशिरस (malshiras band) येथे बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान सकल मराठा समाजातर्फ आजही राज्यातील विविध जिल्ह्यात निषेध नाेंदविण्यात येत आहे. (Maharashtra News)

Maratha Kranti Morcha,Kolhapur, Malshiras
Baramati Accident News : बारामतीनजीक कारच्या धडकेत दाेघा विद्यार्थ्यांचा मृत्यू, जखमी रुग्णालयात दाखल

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात आज (साेमवार) सकल मराठा समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देत मराठा समाजाच्या वतीने जालना येथे घडलेल्या लाठीचार्जचा निषेध नोंदवला गेला. मराठा समाजाला त्वरित आरक्षण द्यावा अशी मागणी मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे.

Maratha Kranti Morcha,Kolhapur, Malshiras
Beed Bus Service Resumes : प्रवाशांना दिलासा, बीड जिल्हा अंतर्गत एसटीची सेवा पूर्वपदावर

आज गडहिंग्लज येथे काँग्रेस आमदार सतेज पाटील (satej patil) हे मराठा समाजाच्या आंदोलनात सहभागी झाले हाेते. जालन्यात मराठा समाजावर झालेल्या लाठीचार्जचा गडहिंग्लज येथे मराठा समाजाच्या वतीने निषेध नोंदवला.

Maratha Kranti Morcha,Kolhapur, Malshiras
NIA Raids In Boisar : दहशतवाद्यांना मदत? एनआयएचा बाेईसरला छापा, तिघे चाैकशीच्या फे-यात

उद्या माळशिरस बंद

सकल मराठा समाजाच्या वतीने उद्या (मंगळवार) माळशिरस बंदची हाक देण्यात आली आहे. एकाही मंत्र्याला माळशिरस तालुक्यात पाय ठेवू देणार नाही असा इशारा सकल मराठा समाजाचे समन्वयक धनाजी साखळकर यांनी सरकारला दिला आहे.

सकल मराठा समाजाची अकलूज येथे बैठक झाली. या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. दरम्यान माळशिरस बंदमध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन सकल मराठा समाजाने केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com