Congress nana patole Saam TV
महाराष्ट्र

Congress News : 'मोदी है, तो मुमकिन है' काॅंग्रेस प्रदेशाध्यक्षांचा टाेला, उन्हाळ्यात पावसाळा...

आज नाना पटाेले ठाणे दाै-यावर आले हाेते.

विकास काटे

Thane News : काँग्रेस नेते राहुल गांधी (congress leader rahul gandhi), निरव मोदी (nirav gandhi), ललित मोदी (lalit modi) यांच्या विरोधात काय चुकीचे बोलले, ते डाकू चोर नसतील तर त्यांनी ते सिद्ध करून दाखवावे. अदानी (adani) आणि मोदी (modi) यांचे नाते काय, निरव मोदी आणि मोदी यांचे नाते काय याचे उत्तर द्यावे असे सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole news) यांनी केला. (Maharashtra News)

राहुल गांधी यांच्या विरोधात जो न्यायालयाने निर्णय दिला आहे त्याचा जाब लोकशाही मार्गाने आंदोलनाच्या माध्यमातून विचारला जाईल असेही पटाेले यांनी स्पष्ट करीत न्याय व्यवस्थेवर सरकारचा दबाव असल्याचा आरोपही केला.

ठाण्यात (thane) आज काँग्रेसच्या वतीने विविध विभाग व सेलच्या एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर आयाेजिलेल्या पत्रकार परिषदेत पटाेले बाेलत हाेते.

निवडणूक आयोगाने सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये निवडणुका लागतील असे सांगितले आहे त्यावर त्यांना छेडले असता मोदी हे तो मुमकीन है असे पटाेलेंनी (nana patole) नमूद केले. ते म्हणाले उन्हाळ्यात पावसाळा, उन्हाळ्यात गारा पडू शकते तर मग मोदी है तो मुमकीन है. त्यामुळे निवडणुका लागतील किंवा लागूही शकत नाहीत.

दीड वर्ष होऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागलेल्या नाहीत ठाण्याची परिस्थिती काय झालेली आहे हे यावरून दिसत आहे, प्रशासक आणि राज्यकर्त्यांच्या माध्यमातून केवळ लूट सुरू आहे असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

आता लोकशाहीला न म्हणणारे सरकार आहे. त्यामुळे काहीही होऊ शकते आधी ईडी सरकार होते आता तीन तिघाडा सरकार आहे त्यामुळे त्यांना निवडणुका पाहिजे की नाही हा एक प्रश्न आहे. त्यातही निवडणूक लागल्या तर त्याचे आम्ही स्वागतच करू.

10 ऑगस्ट पूर्वी विधानसभा अध्यक्षांना शिंदे (eknath shinde) आणि त्यांच्या सहकाऱ्यांबाबत अपात्रतेचा निर्णय घ्यावाच लागेल. त्यांनी जर निर्णय दिला नाही तर मात्र सुप्रीम कोर्टही त्याबाबत निर्णय देऊ शकतो त्यामुळे ते निश्चितच अपात्र होतील असेही त्यांनी स्पष्ट केले.

रोज भरती केली जात आहे, जनेतची देखील जीएसटी आणि विविध करांच्या माध्यमातून लूट केली जात आहे. त्यामुळे हे डाकू आणि लूट करणारे सरकार असून ते सत्तेची मजा घेण्याचे काम करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी राहुल गांधी यांचे अपील फेटाळल्याने नाना पटोले यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी काशिनाथ घाणेकर नाट्यगृहा खालील रस्त्यावर निषेध आंदोलन केले. यावेळी रास्ता रोको करण्याचा प्रयत्नही त्यांनी केला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नाशिकमध्ये तब्बल 3 लाख दुबार मतदार; बोगस मतदारविरोधात शिंदेसेनाच मैदानात

Election Commission: नगर परिषद, नगर पंचायती निवडणूक; उमेदवारांना किती पैसे खर्च करता येतील?

Fact Check : मुंबईतील सोसायट्यांमध्ये फिरतंय भूत? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय? VIDEO

Junnar leopard Attack : बिबट- माणसांचा संघर्ष उफाळला, पुण्यात बिबट्यानं घेतला 60 जणांचा बळी; नागरिक म्हणतात गोळ्याच घाला

Gangster reels : रिलस्टार बनतायेत गँगस्टर? दहशतीच्या रिल्स बनवाल जेलमध्ये जाल, VIDEO

SCROLL FOR NEXT