Lonavala Traffic Rules: लोणावळ्यातील वाहतूक कोंडीवर पाेलिसांचा प्लॅन, स्थानिकांसह पर्यटकांना पाळावे लागणार 'हे' नियम

Lonavala Police News : नियमांचे पालन न केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
Lonavala News, Lonavala Traffic Update
Lonavala News, Lonavala Traffic Updatesaam tv

Lonavala News : लोणावळा शहरातील वाहतूक कोंडीची (Lonavala Traffic Update) समस्या सोडविण्यासाठी पोलिस प्रशासनाने कंबर कसली आहे. मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग (mumbai pune national highway) व शहरातील अंतर्गत रस्ते, भुशी धरणाकडे (bhushi dam) जाणा-या रस्त्यांवर लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक (satyasai kartik) यांनी उपाययाेजना करण्यास प्रारंभ केला आहे. (Maharashtra News)

Lonavala News, Lonavala Traffic Update
Success Story : कडू कारल्याची गोड कहाणी; मावळातील शेतक-याने एक एकरातून कमाविले साडेतीन लाख

वर्षा विहारासाठी राज्यातून व देश विदेशातून मोठ्या संख्येने पर्यटक शहरात येत असतात. लोणावळा शहर व परिसरातील रस्ते हे अरुंद असल्याने पर्यटक वाहने व स्थानिक वाहने यांच्यामुळे शहरात वाहतूक कोंडी निर्माण होते.

Lonavala News, Lonavala Traffic Update
Ambenali Ghat Landslide News : आंबेनळी घाटातील मेटतळेनजीक दरड काेसळली; पोलादपूर-महाबळेश्वर रस्ता वाहतुकीस बंद

व्यावसायिकांना आवाहन

वाहतुक कोंडी निर्माण होवू नये म्हणून लोणावळा शहरात वलवण ते खंडाळा दरम्यान महामार्गावर तसेच कुमार चौक ते रायवूड मार्गे भुशी डॅमकडे जाणारा रोड, मार्केट रोडवर मुख्य रस्त्यावर व रस्त्याचे कडेला कोणत्याही प्रकारची हातगाडी, तात्पुरते स्टॉल किंवा दुकानाच्या समोर साहित्य बाहेर ठेवल्यास अथवा बॅनर लावल्यास तसेच वाहन थांबल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

त्या अनुषंगाने कोणत्याही चिक्की दुकानदार किंवा इतर दुकानदार यांनी आपल्या दुकानाच्या बाहेर रोडच्या कडेला वाहनास अडथळा होईल असे साहित्य ठेवल्यास तसेच रोडकडेला हातगाडी लावल्यास त्यांचेवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

Lonavala News, Lonavala Traffic Update
Ratnagiri- Kolhapur Highway Traffic Update : रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावरील रस्ता खचला, वाहतूक धिम्या गतीने सुरु

माल वाहतुकदारांना पाेलिसांचे आवाहन

व्यापार्‍यांनी त्यांचेकडे माल वाहतूकीची येणारी सर्व वाहने ही दिवसा शुक्रवार शनिवार तसेच रविवार या दिवशी आणू नये. लोणावळ्यात येणार्‍या वाहनांची तपासणी करण्यासाठी वलवण, खंडाळा तसेच नौसेना बाग या ठिकाणी चेकींग पॉईंट लावण्यात आलेले आहेत अशी माहिती सत्यसाई कार्तिक यांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com