Radhakrishna Vikhe Patil Saam Tv
महाराष्ट्र

Namo Rojgar Melava: लातूर येथे लवकरच होणार ‘नमो रोजगार’ महामेळाव्याचे आयोजन, राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली माहिती

Latur News: मराठवाड्यातील युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी लवकरच लातूर येथे ‘नमो रोजगार’ महामेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे, असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

साम टिव्ही ब्युरो

Namo Rojgar Melava:

मराठवाड्यातील युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी लवकरच लातूर येथे ‘नमो रोजगार’ महामेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी कौशल्य विकास विभागाचे सहकार्य घेण्यात येईल, असे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

लातूर जिल्ह्यामध्ये कौशल्य विकास योजनेच्या अंमलबजावणीबाबत महसूल मंत्री विखे-पाटील आणि कौशल्य, रोजगार, उद्योजकता नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या बैठकीस माजी कौशल्य विकास मंत्री संभाजीराव निलंगेकर, कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या आयुक्त निधी चौधरी, लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे (दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे) यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. (Latest Marathi News)

मंत्री विखे पाटील यांनी सांगितले की, ‘एज्युकेशनल हब’ म्हणून मराठवाड्यातील लातूर जिल्हा ओळखला जाते. येथील तरुणांना शिक्षणासोबतच रोजगार मिळावा, यासाठी शासन प्रयत्नशील आहे. त्यामुळे नुकताच नागपूर येथे नुकत्याच झालेल्या रोजगार मेळाव्याप्रमाणे लातूर येथे असा नमो महारोजगार मेळावा घेऊन मराठवाड्यातील युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील. भविष्यात कौशल्य विकासातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार असल्याने कौशल्य विकास, आयटीआय, डीआयसी व व्यवसाय शिक्षण विभागाने यापुढे एकत्रितपणे काम करणे आवश्यक आहे.

लातूर येथील महारोजगार मेळाव्यास निधी उपलब्ध करून देणे आणि इतर सर्व प्रकारचे सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री लोढा यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bin Lagnachi Goshta: जुन्या नात्यांची नवी इनींग; निवेदिता सराफ-गिरीश ओक यांची 'बिन लग्नाची गोष्ट' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा जगातील सर्वात लोकप्रिय नेते ठरले; ७५% लोकांची पसंती|VIDEO

Shocking News : दहावीच्या विद्यार्थिनीने शाळेतच आयुष्य संपवलं, चौथ्या मजल्यावरून मारली उडी

Mumbai To Amravati: मुंबईहून अमरावतीपर्यंत प्रवास करायचा आहे? जाणून घ्या सर्वोत्तम मार्ग आणि महत्त्वाचे टिप्स

भीषण ! डीएसपी रँकच्या २ पोलीस अधिकाऱ्यांच्या अपघातात मृत्यू

SCROLL FOR NEXT