Nalasopara Crime News Saam tv
महाराष्ट्र

Crime News : नालासोपाऱ्यात 'दृश्यम'; बॉयफ्रेंडच्या मदतीनं नवऱ्याची हत्या, घरातच पुरला मृतदेह, असा झाला उलगडा

Nalasopara News : विजय मागील १५ दिवसांपासून बेपत्ता असल्याने बिलालपाडा येथे राहणारे विजयचे दोन भाऊ त्याचा शोध घेत होते. याच दरम्यान दोन दिवसांपूर्वी विजयची पत्नी कोमल चव्हाण हि देखील बेपत्ता झाली

Rajesh Sonwane

मनोज तांबे

नालासोपारा : कोणाला संशय येऊ नये, यासाठी मृतदेह नव्याने बांधकाम सुरु असलेल्या पोलीस स्टेशनमध्येच पुरण्यात आल्याचे दृश्य अजय देवगणच्या दृश्यम या चित्रपटात पाहण्यास मिळाले. याच कथेला अनुरूप अशी हत्येची घटना नालासोपारा मध्ये उघडकीस आली आहे. एका महिलेेने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या करून मृतदहे घरातील जमिनीत गाडल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली आहे.

नालासोपारा येथे उघडकीस आलेल्या हत्येच्या घटनेत विजय चव्हाण (वय ३५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. दरम्यान विजय हा मागील १५ दिवसांपासून बेपत्ता होता. यामुळे बिलालपाडा येथे राहणारे विजय चव्हाण याचे दोन भाऊ त्याचा शोध घेत होते. मात्र तो आढळून आला नाही. याच दरम्यान दोन दिवसांपूर्वी विजयची पत्नी कोमल चव्हाण हि देखील बेपत्ता झाली होती. यामुळे परिवार अधिक गोंधळून गेला होता. 

प्रियकरासोबत पत्नी फरार 

दरम्यान कोमल बेपत्ता झाल्यानंतर तिच्या पाठोपाठ शेजारी राहणारा मोनू शर्मा हा तरुण देखील बेपत्ता झाला होता. कोमल चव्हाण आणि मोनू शर्मा यांच्यात प्रेमसंबंध होते आणि त्यातून ते दोघे पळून गेल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. यामुळे पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांकडून दोघांचाही शोध सुरु आहे. 

टाईल्सच्या वेगळ्या रंगामुळे घटना उघड  
दरम्यान, सोमवारी सकाळी विजय चव्हाण यांचे दोन्ही भाऊ गडगापाडा येथील ओम साई या निवासस्थानी आले. यावेळी घरातील टाईल्सचे रंग वेगळे असल्याचे दिसून आले. यानंतर त्यांनी टाईल्स खोदून काढली असता याठिकाणाहून दुर्गंधी येऊ लागली. यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांना बोलावले. सध्या पेल्हार पोलीस घटनास्थळी असून लाद्या काढून मृतदेह शोधण्याचे काम सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amruta Khanvilkar: सातासमुद्रापार चंद्राच्या नृत्याविष्काराचा डंका; अमृता खानविलकरच्या लावणींची फॉरेनर्सना पडली भुरळ

Akola Heavy Rain : अकोला जिल्ह्यात ढगफुटीसदृश्य पाऊस; गावात नदीचे स्वरूप, पुरात वाहून गेल्याने तरुणाचा मृत्यू

Maharashtra Live News Update: कृषिमंत्री कोकाटे यांच्या अंगावर पत्ते उधळण्याचा ठाकरे गटाकडून प्रयत्न

Egg: अंडं व्हेज की नॉनव्हेज? जाणून घ्या वैज्ञानिक कारण

Ova Benefits: ओवा खाण्याची योग्य पद्धत कोणती? कोमट पाणी की नुसता ओवा?

SCROLL FOR NEXT